आध्रं प्रदेश येथील प्रसिद्ध देवस्थान तिरुपती बालाजीला लोक नवस करुन तो फेडण्यासाठी केस दान करतात. या ठिकाणी केस दान केल्यास आपल्या इच्छा पुर्ण होतात अशी लोकांची मान्यता आहे. त्यामुळे देवाकडे मागितलेली इच्छा पुर्ण झाल्यावर लोक डोक्यावरचे केस तेथे अर्पण करतात. या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शन घेण्याआधी डोक्याचे मुंडन करतात.

आता या मुंडन केलेल्या केसांवरुन चकीत करायला लावणारी गोष्ट समोर आली आहे. ज्या केसांना तुम्ही नवस पुर्ण झाल्यावर मोठ्या श्रद्धेने केस अर्पण करतात त्याच केसांची चीनला स्मगलिंग केली जात आहे. असम राइफल्‍स ने ह्यूमन हेयर स्‍मलिंगची पोलखोल केली आहे. म्यानमार मार्गे भारतातून या केसांची त*स्क*री चीनला केली जात आहे.

असम राइफल्‍स ने त*स्क*री करण्यात येत असलेले माणसांचे केस बॉर्डर क्रोस करुन म्यानमारला पाठवले जात होते ते मिजोराम येथे पकडले. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा दोन ट्रकमध्ये गोण्यांमध्ये केस सापडले. म्यानमार बॉर्डर उघडलेली तेव्हा तेथुन अनेक गोष्टींची त*स्क*री केली जात होती. त*स्क*री करणाऱ्या ट्रक चालकांना असम राइफ्सने अटक केली. त्यावेळी त्या ट्रक चालकांनी कबुली दिली कि ते केस आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजी वरुन मिजोरामला गेले आणि तेथुन ते म्यानमार व म्यानमार वरुन थायलंडला पाठवले जात होते.

या केसांपासुन विग बनवुन चीन करतो खुप कमाई – मिजोरामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले कि या मानवी केसांचे प्रोसेसिंगनंतर विग बनवले जातात. हे केस केवळ चीनकडुनच नव्हे तर इतर धार्मिक स्थळांवरुन देखील स्मगलिंग केले जातात. चीननंतर हे विग जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात केले जातात. चीनकडे ७० % वैश्विक वीग बाजार आहे. त्यामुळे सध्या चीन भारताकडुन जास्तीत जास्त मानवी केस मिळवत आहे. चीनमध्ये बनवले जाणारे विग सेंट्रल आशिया आणि युरोप येथे सप्लाय केले जातात.

त*स्क*री करण्यात आलेल्या केसांची किंमत तब्बल २ करोड – हे ऑपरेशन असम राइफल्स आणि सीमा शुल्क विभाग, चंपई जिल्हाच्या टीमद्वारे विशेष सुचनांच्या आधारे केली होती. ही त*स्क*री त्यांनी म्यानमार बॉर्डरवरुन सात किलोमीटर आधी पकडली. त्या ट्रकमध्ये १२० बॅगांमध्ये ५० किलो केस भरले होते. या केसांची किंमत १,८०,००,००० रुपये आहे. असम राइफ्सने बरीच वर्षे मिजोराममध्ये होणाऱ्या त*स्क*रीविरोधात काम केले. भारत-म्यानमार सीमेसोबत त*स्क*री थांबवण्यासाठी व्यापक स्वरुपात एंटी-जब्ती अभियान सफल केले.

म्यानमार बॉर्डर चालु असल्यामुळे होत आहे त*स्क*री – अधिकाऱ्यांनी सांगितले कि मिजोरामची ८० टक्के बॉर्डर बांग्लादेश आणि मिजोरामला जोडुन आहे. त्यातील ५१० किलोमीटर भाग म्यानमारमध्ये येतो. मिझोराममध्ये म्यानमारसोबत त्याच्या सीमेचा ५१० किलोमीटरचा भाग व्याप्त आहे. तेथील सीमा खुली असुन तेथे अमली पदार्थ, हत्यारे, आणि सोन्याची त*स्क*री केली जाते. आता असम राइफल्सने सीमेवर मानवी केसांची त*स्क*रीची पोलखोल केली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *