चणे खाल्यामुळे ब्लड शुगरपासुन आराम मिळतो. तसेच चण्यांमुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण राखता येते असे एका रिसर्चमध्ये आढळुन आले आहे. मधुमेहाचे होण्याचे आणखी एक कारण म्हणजे भुख लागणे सुद्धा असु शकते. चण्यामुळे भुख कमी लागते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो. चण्यात प्रोटीन, ग्लाइस्मिक इंडेक्स आणि फायबरसारखे पोषक तत्वे असतात.
चणे खाल्यास वजन कमी होते – भिजवलेले चणे खाल्यास त्याचा फायदा वजन कमी करण्यास होतो. चण्यांमध्ये फायबरसोबत अनेक पोषक तत्वे सुद्धा असते. वाढत्या वजनामुळे त्रस्त असलेल्या लोकांसाठी गार्बेज बीन्स लाभदायक असतात. ग्लाइसेमिक लोड ,ग्रिलिन हार्मोन, फाइबर, भूख हार्मोनला कमी करण्यास मदत करतात.
एनीमियासाठी सुद्धा भिजवलेले चणे फायदेशीर असतात – एनीमियावर घरगुती उपाय करता येतो. यासाठी चण्याचे सेवन करावे. कारण चण्यात प्रोटीन सोबतच लोहाचे सुद्धा गुण असतात. शरीरात लोहाचा अभाव असल्यास एनीमिया चा त्रास होतो. यासाठी भिजवलेले चणे खावेत. चण्यांमुळे हिमोग्लोबिनचा स्तर उच्च राखण्यास मदत होते. यासाठी रात्री चणे भिजवुन ठेवावे व ते सकाळी उठल्यावर उपाशी पोटी खावेत. यामुळे शारीरिक व्याधींपासुन सुटका होते.
चणे हे प्रोटीनचे चांगले स्त्रोत आहेत – मानवी शरीरातील विकासासाठी प्रोटीन्सची आवश्यकता असते. प्रोटीन्स हे चण्यामधुन मिळतात. भाजलेले चणे आणि दूध प्यायल्यामुळे प्रोटीन्स मिळतात. जे व्यक्ती शाहाकारी असतात त्यांच्यासाठी प्रोटीन्स मिळवण्यासाठी चणे हा उत्तम पर्याय आहे.
चणे खाल्यास केसांना सुद्धा फायदा होतो – सध्याच्या धावपळीच्या जगात केसांकडे पुरेसे लक्ष देण्यास फारसा कोणाकडे वेळ नसतो. पण जर तुम्ही तुमच्या आहारात नियमित जर चण्यांचा समावेश केल्यास त्याचा लाभ केसांना होतो. कारण केसांसाठी उपयुक्त असलेले विटामिन बी चण्यांमध्ये असते. त्यामुळे केसांमध्ये दाटपणा येतो. केसांची वाढ जलद गतिने होते. तसेच केसातील कोंडा कमी करण्यास चण्यांचा वापर होतो. चण्यांमुळे केसांना प्रोटीन्स मिळतात.
उपाशी पोटी चणे खाल्यास कोलेस्ट्रोल कमी होतो – कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी चणे खुप फायदेशीर असतात. चण्यात असलेले फायबर पित्त कमी करण्यास मदत करते.तुम्ही रोज जर चण्याचे सेवन केलात तर कोलेस्ट्रॉल ट्राइग्लिसराइड्स आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त चण्यांमुळे रक्तवाहिन्यांमधील अडथळे सुद्धा दूर होतात.
महिलांसाठी चणे फायदेशीर असतात – उपीशी पोटी भिजवलेले किंवा मोड आलेले चणे खाल्यास त्याचा महिलांना खुप फायदा होतो. महिलांमध्ये अनेकदा सफेद पाण्याच्या स्त्रावाची समस्या कमजोरीमुळे निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही नियमित चण्यांचे सेवन केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होतो. चण्यांमुळे महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर, ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या आजारांना रोखता येते.
चण्यांमुळे शरीरातील उर्जा वाढते – सकाळी उपाशी पोटी चणे खाल्यास शरीराला दिवसभर पुरेल इतकी उर्जा मिळते. यामुळेच घोड्याला चणे खायला घालतात. त्यामुळे तो खुप अॅक्टीव्ह राहतो. चण्यांमुळे आपल्या मांसपेशींना बळ मिळते. त्यामुळे व्यायाम नीट आणि खुप काळ करता येतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.