कपिल शर्मा शो मधल्या चहावाला चंदुची बायको आहे परीसारखी सुंदर, फोटोज पाहून वेडे व्हाल !

98

टेलिव्हिजन इंडस्ट्रिमधला सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो द कपिल शर्मा शो मधला प्रत्येक कलाकार हा प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. चंदन प्रभाकर, कीकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती आणि कृष्णा अभिषेक हे कलाकार गेली कित्येक वर्षे या शोमध्ये काम करत आहेत. आज आम्ही तुम्हाला या शोमध्ये काम करणाऱ्या चंदु चा रोल करणाऱ्या चंदन प्रभाकर बद्दल सांगणार आहे.

या शो मध्ये चंदन हा चंदु चायवालाची भुमिका साकारतो. खऱ्या आयुष्यात चंदु विवाहीत आहेत. त्याची पत्नी खुप सुंदर आहे. त्याला एक मुलगी सुद्धा आहे. चंदन प्रभाकारचा जन्म १९८० मध्ये अमृतसरला झाला. त्याची व कपिलची चांगली मैत्री आहे. कपिलसोबत कॉमेडी करुन चंदनने सुद्धा स्वताची ओळख निर्माण केली. २०१५ मध्ये चंदनने नंदिनी खन्नासोबत लग्न केले. नंदिनी इतर अभिनेत्रींसारखीच सुंदर आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी चंदन व नंदिनीला एक मुलगी झाली. त्यांच्या मुलीचे नाव अदविका असे आहे.

चंदनला त्याचा परिवार खुप जवळचा आहे. सोशल मीडियावर चंदन अनेकदा त्याच्या पत्नी व मुलीसोबत फोटो टाकत असतो. चंदनचे इन्स्टाग्रामवर २ लाख फॉलोवर्स आहेत. कपिल शर्मा शो मध्ये आपण पाहतो कि चंदन त्यात भुरीची भुमिका साकारणाऱ्या सुमोना चक्रवर्तीच्या पाठी लागलेला असतो. मात्र त्याची स्वताची पत्नी खुप सुंदर असल्यामुळे तो खऱ्या आयुष्यात असे करुच शकत नाही. गेली अनेक वर्षे चंदन चंदुची भुमिका साकारत आहे.

चंदन प्रभाकार आज करोडो रुपयांचे मालक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कपिल शर्मा शो साठी त्याला प्रति एपिसोड एक लाख रुपये फि दिली जाते. काही दिवसांपुर्वीच चंदनने नवी कोरी बीएमडब्ल्यु कार खरेदी केली. त्या संबंधीचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.