बॉलिवुडच्या पडद्या पाठी अनेक किस्से घडत असतात ज्याची खबर सर्व सामान्य लोकांना लागत नाही. तुम्हाला माहित आहे का चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान काही अभिनेत्री गरोदर राहिल्या होत्या. विशेष म्हणजे प्रेग्नंसीमध्येच त्या अभिनेत्रींनी त्या चित्रपटाचे काम पुर्ण केली. आज आम्ही तुम्हाला अशा काही ट़ॉपच्या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत.

1. जया बच्चन – बॉलिवुडमधील सर्वात महत्वाचा मानला जाणारा शोले या चित्रपटात जया बच्चनने खुप महत्वाची भुमिका बजावली होती. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच जया गरोदर होत्या. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये जयाचे बेबी बंप दिसले होते. मात्र लोकांना तेव्हा ती गोष्ट समजली नव्हती.

2. जुही चावला – बॉलिवुड मध्ये जुही चावला ही एके काळची सुंदर व प्रतिष्ठीत अभिनेत्री म्हणुन ओळखली जायची. मात्र झंकार बीटस् या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानच ती प्रेग्नंट राहिली. विशेष म्हणजे ती त्या चित्रपटात एका गरोदर स्त्रीची भुमिका निभावत असल्यामुळे ते कोणाला एवढे समजुन आले नाही. त्यानंतर जेव्हा जुही चावलाच्या खऱ्या प्रेग्नंसीची बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा या गोष्टीच्या चर्चा खुप व्हायला लागल्या.

3. श्रीदेवी – बॉलिवुडटी हवाहवाई गर्ल जुदाई चित्रपटाच्या शुटींगवेळीच प्रेग्नेंट झाली होती. त्यावेळी ती तिची मोठी मुलगी जान्हवी कपुरला जन्म देणार होती. त्यावेळी श्रीदेवीच्या प्रेग्नंसीमुळे मिडियामध्ये गदारोळ माजला होता. श्रीदेवी प्रेग्नंट होती त्यावेळी तिचे व बोनी कपुरचे अफेअर चालु होते. मात्र लग्न झाले नव्हते. श्रीदेवी प्रेग्नंट झाल्यावर त्या दोघांनी लग्न केले.

4. ऐश्वर्या राय बच्चन – बॉलिवुड अभिनेत्री आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही सुद्धा तिच्या लग्नापासुन ते अगदी तिच्या प्रेग्नंसीपर्यंत चर्चेत होती. ऐश्वर्या हिरोइन चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच प्रेग्नेंट होती. त्यामुळे तिला तो चित्रपट अर्ध्यावर सोडावा लागला. त्या चित्रपटाचा काही भाग सुद्धा तिने शुट केला होता. त्यानंतर ऐश्वर्याची जागा करीनाने घेतली.

5. काजोल – काजोल २०१० मध्ये दुसऱ्यांदा गरोदर होती. त्यावेळी ती करण जोहरचा वि आर फॅमिली या चित्रपटाचे चित्रीकण करत होती. प्रेग्नंट असल्यामुळे काजोलने त्या चित्रपटाच्या एका गाण्यावरव डान्स करण्यास नकार दिला होता. त्यामुळे करणने काजोलसाठी ती सहज करु शकेल अशी स्टेप कोरीओग्राफर कडुन बसवुन घेतली होती. त्या चित्रपटाच्या तीन दिवसांनी म्हणजेच १० सप्टेंबर काजोलने तिचा मुलगा युगला जन्म दिला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *