अक्षय कुमार हा बॉलीवुड मधील सर्वात विश्वासार्हता असलेला अभिनेता आहे. २०१९ मध्ये अक्षयचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि चारही चित्रपट यशस्वी ठरले. फ़िल्मफेयर वेबसाइटच्या नुसार, अक्षय सध्या च्या काळात ३० उत्पादकांची जाहिरात करत आहे. त्यामध्ये ग्राहक उत्पादनापासून लक्झरी सामान पर्यंत यांचा समावेश आहे. अहवालानुसार अक्षय एका जाहिरातीसाठी एका दिवसाचे दोन ते तीन कोटीं रुपये मानधन आकारतो. डफ अँड फेल्प्स च्या अभ्यासानुसार अक्षय ची ब्रँड व्हॅल्यू ७४२करोड रुपयांच्या आसपास आहे. अक्षय कुमार हा बॉलीवुड मधील सर्वात विश्वासार्हता असलेला अभिनेता आहे.

२०१९ मध्ये अक्षयचे चार चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि चारही चित्रपट यशस्वी ठरले. गेल्यावर्षी अक्षयचा पहिला चित्रपट केसरी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने १५३ करोड रुपयांचे कलेक्शन केले होते. दुसरा चित्रपट “मिशन मंगल” हा होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रभाव पाडला होता म्हणजेच २०० कोटीं रुपये जमा केले होते.

तिसरा चित्रपट होता हाउसफुल-४, या चित्रपटाने २०६ करोड रुपयाचे कलेक्शन केले होते आणि चौथा चित्रपट गुड न्यूज ने सुद्धा २०१ कोटीं रुपये जमा केले होते. २०१९ मध्ये अक्षय कुमारच्या चित्रपट यांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, याचा परिणाम असा की ७५० कोटीं पेक्षा अधिक कमाई या चार चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर केली होती.

या वर्षीसुद्धा अक्षय कुमारचे चार चित्रपट प्रदर्शित होणार होते परंतु कोविंड म*हा*मा*री मुळे चित्रपटगृह बंद असल्याच्या कारणां मुळे काही चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाही आणि काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर मोठा धुमाकूळ घालणारा सिद्ध झाला असता.

चित्रपट विश्वातील परिस्थिती नीट झाल्यावर चित्रपट गृहात चित्रपट प्रदर्शित केले जाईल. २०२० च्या दिवाळीमध्ये पृथ्वीराज आणि डिसेंबर मध्ये बच्चन पांडेय हे चित्रपट प्रदर्शित होणार होते. बच्चन पांडेय हा चित्रपट पुढील वर्षाकरिता पुढे करण्यात आलेला आहे.

तसेच अक्षय कुमारचे चित्रपट हे फक्त चित्रपट नसून समाजातील वास्तविकता दर्शवणारे सुद्धा असतात. आतापर्यंत अक्षय कुमारने अनेक चित्रपट केलेले आहेत, या चित्रपटाद्वारे समाज प्रबोधन सुद्धा झाले आहे म्हणून अक्षय कुमार हा सर्व चाहत्या वर्गांना हवाहवासा वाटणारा असतो. त्याचे चित्रपट प्रेक्षक सुद्धा मोठ्या आवडीने पाहतात. आपल्याला वरील लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *