सध्याचा टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात प्रसिद्ध असा इंडियन आयडॉल हा शो या ना त्या कारणावरुन सतत चर्चेत असतो. या कार्यक्रमाचा सध्या १२ वा सिजन चालु आहे. हा शो त्यातील स्पर्धांसोबतच त्यातील परीक्षकांमुळे सुद्धा चर्चेत असतात. प्रत्येक सिंगिग शो मध्ये परीक्षक हे आकर्षणाचा केंद्र बिंदु असतात. या शोच्या बाबतीत सुद्धा असेच काहीस आहे. यातील परीक्षक या शोमध्ये काम करण्यापुर्वीपासुनच खुप प्रसिद्ध आहेत.
इंडियन आयडॉलच्या १२ व्या सीजनमध्ये हिमेश रेशमिया, नेहा कक्कड आणि विशाल ददलानी हे परीक्षक म्हणुन काम पाहत आहेत. हे तीनही परीक्षक एका एपिसोडसाठी लाखो रुपये फि घेतात. चला तर जाणुन घेऊ कोणता परीक्षक किती फि घेतो. सोबतच या शोचा होस्टसुद्धा किती फि घेतो ते जाणुन घेऊ.
विशाल ददलानीची प्रति एपिसोड फि – हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध म्युझिक कंपोजर आणि अनेक गाण्यांचा आवाज असलेले विशाल ददलानीसुद्धा अनेक वर्षे इंडियन आयडॉलमध्ये परीक्षक म्हणुन काम पाहत आहेत. विशाल ददलानीची फि नेहा कक्कडपेक्षा कमी आणि हिमेश रशमिया पेक्षा जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार विशाल ददलानीला निर्मात्यांकडुन एका एपिसोडचे ४.५ लाख रुपये मिळतात.
हिमेश रेशमियाची फि प्रति एपिसोड – हिमेश रेशमिया सध्या अनु मलिकच्या जागी इंडियन आयडॉलमध्ये परीक्षक म्हणुन काम करत आहे. काही दिवसांपुर्वी मी टु प्रकरणी अनु मलिक यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांच्या जागी तिथे हिमेश रेशमियाची वर्णी लागली. हिमेश रेशमियाची फि इतर परीक्षकांपेक्षा कमी आहे. तो प्रति एपिसोड ४ लाख रुपये फि घेतो.
नेहा कक्कडची फि – नेहा कक्कड ही सध्याची आघाडीची आणि सर्वात महागडी गायिका आहे. तिचा आवाज जादुई असल्यामुळे ती करोडो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. एके काळी नेहा स्वता इंडियन आयडॉल या शोची स्पर्धक म्हणुन सहभागी झाली होती. आता ती या शोची परीक्षक म्हणुन काम पाहत आहे. नेहा कक्कडची फि प्रति एपिसोड ५ लाख रुपये आहे.
आदित्य नारायण – दिग्गज गायक उदित नारायणचा मुलगा आदित्या नारायण सध्या कोराना व्हायरसशी लढत आहे. काही दिवसांपुर्वी आदित्य व त्याची पत्नी कोरोना संक्रमित झाले. आदित्य इंडियन आयडॉलच्या या सीझनचे सुत्रसंचालन करत आहे. तो प्रति एपिसोड 2.50 लाख रुपये फि घेतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !