साऊथकडील सिनेमा म्हटलं तर दर्जेदार चित्रपट, जबरदस्त अॅक्शनपट यांसारख्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण या गोष्टी वर्णी लावण्यासाठी गरज असते ती उत्कृष्ठ कलाकारांची. साऊथकडील चित्रपटांना अनेक दिग्गज कलाकांचा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री सामंथा अक्किनेनी. तिचे सौंदर्य नेहमीच तिच्या चाहत्यांचे मन जिंकुन घेत असते. याचा प्रतिचय तिच्या सोशल मिडियावरील लाखो फॉलोवर्ससवरुन येतोच.

तिचे चाहाते हे केवळ साऊथमधीलच नसुन इतर भाषिय सुद्धा आहेत. सामंथाने २०१७ मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न केले. सामंथा तिच्या वैयक्तिक आयुष्यापासुन ते अगदी प्रोफेशनल लाइफपर्यंत सर्वच बाबतीत चर्चेत असते. आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. नुकताच सामंथा आणि नागा यांचा घ*ट*स्फो*ट झाला.

मंडळी तुम्हाला माहित आहे का कि चैतन्यसोबत लग्न करण्यापुर्वी सामंथाचे रंग दे बंसती मधल्या सिद्धार्थवर प्रेम होते. त्याच्यासोबत तर तिला लग्न सुद्धा करायचे होते. मात्र त्यांचा ब्रेकअप झाला आणि मग सर्वच संपले. असे म्हटले जाते कि सिद्धार्थला घेऊन सामंथा खुप सिरीयस होती. पण त्यांच्या ब्रेकअप नंतर अवघ्या काही दिवसांतच सामंथाने चैतन्यसोबत लग्न केले. या दोघांचे खुप धुमधडाक्यात लग्न लावुन दिले होते.

सिद्धार्थ आणि सामंथाची ओळख जबरदस्त चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर या दोघांना एकत्र वेळ घालवताना पाहिले गेले. त्या दोघांमधील जवळीक वाढु लागली होती. पण या दोघांनी त्यांच्या प्रेमाचा खुलासा कधीच सगळ्यांसमोर केला नाही. एकदा एका इव्हेंटमध्ये सिद्धार्थने डान्स केला होता त्यावेळी त्याने तो डान्स सामंथाला डेडीकेट केला होता. त्यावेळी सामंथासुद्धा खुप लाजली होती.

मिळालेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि सामंथा त्याच्या नात्याबद्दल खुप गंभीर होते. ते लिव्ह अन मध्ये सुद्धा राहायचे. ते एकमेकांसोबत दिड वर्ष एकत्र होते. मात्र त्यानंतर त्यांच्यात सर्व काही बिघडत गेले. त्यांचा ब्रेकअप नक्की कोणत्या कारणावरुन झाला हे समजु शकले नाही.

एकदा एका मुलाखतीत सामंथाने सिद्धार्थबद्दल मनमोकळे पणाने सांगितले होते. तिने सांगितले कि मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खुप अडचणींचा सामना केला आहे. माझ्या नात्याच्या सुरुवातीलाच मला खुप गोष्टी समजल्याने मी पुढे जाऊ शकली. त्यावेळी मला पुढे काहीतरी वाईट होऊ शकते अशी चाहुल लागली होती. नुकताच सामंथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *