बॉलिवुडचा भाईजान सलमान खानच्या राधे या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉंच झाला. त्यांचा हा ट्रेलर सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता सर्वसामान्यांसोबतच सेलिब्रेटींनीसुद्धा लागलेली दिसुन येते. या चित्रपटाचे नायक व नायिका हे सलमान खान आणि दिशा पठाणी असुन खलनायक रणदिप हुड्डा आहे. या तिघांची अनोखी केमेस्ट्री पडद्यावर पाहण्यास सध्या सर्वच जण उत्सुक आहेत.

या सिनेमात सलमान व दिशाचा किसिंग सीन सध्या खुप चर्चेत आहे. अशातच आता त्या सीनवर दिशा पठाणीचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफची प्रतिक्रिया समोर आली आहे. टायगरसाठी हा चित्रपट खुप खास आहे कारण या चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड प्रमुख भुमिकेत आहे शिवाय त्याच्या वडिलांची म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची सुद्धा त्या चित्रपटात एक महत्वाची भुमिका आहे.

टायगरने राधे चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाल्या झाल्या त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवली. टायगरने सलमान आणि दिशाचा फोटो त्याच्या अकाउंटवर पोस्ट करत त्यांच्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. टायगर श्रॉफने दिशाचा हॉट फोटो शेअऱ करत लिहिले कि या धमाकेदार ट्रेलरसाठी खुप शुभेच्छा. तु यात खुप छान दिसत आहे.

तसेच त्याच्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने सलमान खानचा फोटो शेअर करत म्हटले कि चित्रपटासाठी अभिनंदन ! तसेच हा चित्रपट नक्कीच ब्लॉकबस्टर ठरेल असे म्हटले. तर तिसऱ्या पोस्टमध्ये टायगरने त्याच्या वडिलांचा जॅकी श्रॉफचा फोटो शेअर करत हॅंण्डसम असे म्हटले आहे.

सलमान आणि दिशा – सलमान आणि दिशाने यापुर्वी ही भारत या चित्रपटात काम केले होते. भारत या चित्रपटात दिशाने स्लो मोशन या आयटम सॉंग मध्ये डान्स केला होता. त्या गाण्यात सुद्धा एका सीनमध्ये ती सलमानला किस करताना दिसते. पण या वेळी ती पहिल्यांदाच राधे चित्रपटामार्फत सलमान खान सोबत अभिनय करत आहे.

व्हिलन रणदिप हुड्डा – सलमानच्या राधे चित्रपटात रणदिप हुड्डा खलनायकाच्या भुमिकेत दिसणार आहे. यावेळेस त्याचा नवीन अवतार पाहण्यास मिळणार आहे. राधे चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि रणदिप हुड्डाच्या फायटिंगमुळे जास्त हिट झाला आहे.

राधेचे ट्रेलर रिलीज होण्यापुर्वी त्याचे एक नवे पोस्टर सुद्धा रिलीज करण्यात आले. ज्यात सलमान बं*दु*की*ने दुश्मानांचे छ*क्के उडवताना दिसतो. राधे – यु आर मोस्ट वॉण्टेड भाई हा चित्रपट १३ मे ला ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. मात्र कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे निर्माते प्रदर्शनाबाबत संभ्रमात पडले आहेत. कदाचित हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सिनेमा गृहात एकाचवेळी प्रदर्शित केला जाऊ शकतो. ‘पे-पर-व्‍यू’ सिस्टमच्या अंतर्गत जीप्लेक्सवर हा चित्रपट प्रेक्षक पाहु शकतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *