बॉलिवुडला अनेक दिग्गज संगितकार लाभले. त्यांनी संगितबद्ध केलेली गाणी आज सर्वत्र देशाविदेशात ऐकली जातात. काही संगितकार हे जोड्यांनी गाणी तयार करायचे. त्यातीलच एक जोडी म्हणजे नदिम-श्रवण. मात्र दु*र्दे*वा*ने या जोडीतल्या श्रवण राठोड यांचे मुंबईत कोरोनामुळे दुखद नि*ध*न झाले. त्यांच्यावर एस एल रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार चालु होते. श्रवण यांचे वडिल पंडित चतुर्भुज राठौड हे सुद्धा संगितकार आणि शास्त्रीय गायक होते. कल्याणजी आनंद यांची जोडी पंडित चतुर्भुज राठौड यांचे शिष्य होते.

श्रवण यांनी नदिमसोबत मिळुन ९० च्या दशकात अनेक चित्रपटांना संगित दिले होते. मात्र १९९७ मध्ये गुलशन कुमार यांच्या ह*त्या*प्रकरणात नदिम यांचे नाव समोर आल्यावर ते लंडनला पळुन गेले. त्यानंतर बॉलिवुडने या जोडीला दुर केले. श्रवण यांना सुद्धा त्या प्रकरणाची शिक्षा भो*गा*वी लागली. त्यामुळे त्यांचे चढते करीयर डबघाईला आले.

श्रवण यांचे भाऊ रूप कुमार राठौड़ आणि विनोद राठौड़ हे दोघेसुद्धा गायकांच्या दुनियेतील मोठे नाव आहे. सध्या संपुर्ण इंडस्ट्रीला श्रवण यांच्या नि*ध*नाचा मोठा धक्का बसला आहे.

श्रवण यांच्यावर कोरोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांना इतर अन्य आजार सुद्धा होते. त्यामुळे सु्द्धा त्यांची तब्येत बिघडत चालली होती. त्यांच्या इतर गंभीर आजारांमुळे त्यांच्या कोरोनाच्या उपचारांवर अडचणी येत होत्या. आज सकाळी त्यांची तब्येत जास्तच बिघडली आणि त्यांचा दुखद अं*त झाला.

श्रवण यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५४ ला झाला होता. १९९० मध्ये नदिम श्रवण यांची जोडी खुप प्रकाशझोतात आलेली. नदिम सैफी यांनी श्रवण यांच्या सोबत अनेक चित्रपटांना शानदार संगित दिले. आशिकी चित्रपटातील त्यांची रोमॅण्टिक गाणी विशेष गाजली. पण गुलशन कुमार यांच्या ह*त्ये*नंतर त्यांची जोडी तुटली.

नदिम श्रवण यांच्या जोडीने ‘आशिकी’, ‘साजन’, ‘सड़क’, ‘दिल है कि मानता नहीं’, ‘साथी’, ‘दीवाना’, ‘फूल और कांटे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘जान तेरे नाम’, ‘रंग’, ‘राजा’,  ‘धड़कन’, ‘परदेस’, ‘दिलवाले’, ‘राज’ यांसारख्या चित्रपटांना संगितबद्ध केले. त्यांची गाणी आजदेखील खुप प्रसिद्ध आहेत.

नेट वर्थ पोस्ट या संकेतस्थळाच्या माहितीनुसार त्यांचे नेट वर्थ म्हणेजच प्रॉपर्टी ही तब्बल ७ मिलीयन डॉलर्स एवढी संपत्ती आपल्या कुटुंबियांसाठी पाठीमागे सोडली ! त्यांना राजा हिंदुस्थानी, दिवाना, साजण, आशिकी, या चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तर धडकन या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *