तुमचा जोडीदार तुमच्यावर खरे प्रेम करतो की नाही ते या तीन पद्धतीने जाणून घ्या !

56

कुठलेही नाते विश्वासावर टिकते. जर तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास नसेल तर तुमचे नाते कमजोर होते. कित्येकदा अनेक नात्यांमध्ये असे दिसुन येते कि त्यांचे नाते टिकुन असते मात्र कोणत्यातरी गोष्टींवर अविश्वास असतो. माझा जोडीदार माझ्यावर खरे प्रेम करतो कि नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला जाणुन घ्यायचे आहे कि तुमच्या पार्टनरला तुमच्या बद्दल फिलिंगस् आहेत कि नाही. म्हणजे तुम्ही खुश आहात, दुखी आहात , तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे का या सर्व गोष्टी त्याला न सांगता समजतं का. तसेच तुमच्या डोळ्यांवरुन किंवा तुमच्या बॉडी लॅग्वेजवरुन जर त्याला समजत असेल तर समजुन घ्या त्याचे तुमच्यावर खरे प्रेम आहे. असे लोक त्यांच्या जोडीदाराला कधीच धोका देत नाही. ते त्याच्याशी आयुष्यभर विश्वासु राहतात.

2. जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हा तुमचा जोडीदार तुमची काळजी घेतो का .. किंवा तुम्ही आजारी असल्यास तुमचे औषध पाणी तो मनापासुन करतो की फक्त दिखावा करत आहे. तुम्ही दुखी असाल तर तो सुद्धा दुखी होतो का … तुमच्या सुखात तो ही खुष होतो का.. तुमच्या अडचणी सोडवायला तो मदत करतो कि इग्नोर करतो. या सर्व गोष्टीसुद्धा तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करतो हे जाणुन घेण्यास उपयोगी ठरतात.

3. तुमचा पार्टनरला तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींचे किती वाईट वाटते या गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. खरा प्रेमी तोच असतो जो त्याच्या साथीदाराच्या बोलण्याचे कधीच वाईट वाटुन घेत नाही. किंवा जरी त्याला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तो त्याचे सुद्धा वाईट वाटुन घेत नाही. त्याउलट तो तुम्हाला प्रेमाने समजवतो. एका खरे प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या याच सवयी त्याला वेगळे बनवतात. जर तुमचा जोडीदार या परीक्षेत पास होतो तर तो तुम्हाला आयुष्यभर सुखी ठेवण्यास समर्थ असतो.

तुमच्यामध्ये कधीच भांडणे होणार नाहीत. तुम्हाला या तीनही पद्धती आवडल्या असतील. तर वेळ दवडु नका आणि तुमच्या जोडीदाराच्या या परीक्षा घेऊन पहा. आणि पहा तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !