बॉलिवूड म्हटलं की जबरदस्त बजेट असलेले चित्रपट प्रसिद्ध कलाकार आणि त्यासोबतच शानदार लाईफस्टाईल, मोठमोठाले बंगले आणि गाड्या असा हा सर्व लवाजमा आलाच. बॉलिवूडमध्ये देखील असे काही कलाकार आहेत, जे अशी शानदार लाईफस्टाईल जगण्यासाठी ओळखले जातात. हे कलाकार बॉलिवूड दुनियेतील श्रीमंत कलाकारांमध्ये होते. हे कलाकार चिरपटांमध्ये अभिनयासाठी देखील जास्त मानधन आकारतात. सोबतच या कलाकारांचे भारतात तर शानदार बंगले, फ्लॅट्स आहेतच सोबतच विदेशात देखील यांचा प्रॉपर्टी आहेत., चला तर पाहूया कोण आहेत हे कलाकार…..

1. अक्षय कुमार – १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या सौगंध या हिंदी चित्रपटातून अक्षय कुमारने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले पण खिलाडी या चित्रपटानंतर खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर एका मागोमाग एक हिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये स्वतःच अढळ स्थान निश्चित केले आणि आता अक्षय कुमार चित्रपटांसाठी सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या यादीमध्ये येतो. अक्षय कुमारची मुंबई व गोवा या दोन ठिकाणांव्यतिरिक्त कॅनडामध्ये हि प्रॉपर्टी आहे. त्याच कॅनडामध्ये एक हॉलिडे होम असून ते फारच आलिशान आणि सुंदर आहे. या व्यतिरिक्त टोरोन्टोमध्ये अक्षयने पूर्ण टेकडी खरेदी केली आहे आणि त्यावर एक अपार्टमेंट व बंगला बांधला आहे.

2. शाहरुख खान – बॉलिवूडचा बादशाह समजला जाणारा शाहरुख खान याला बॉलिवूडमधील यशस्वी कलाकारांपैकी एक गणले जाते. ८० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये काम करत शाहरुख हा भारतात नव्हे तंत्र जभरात प्रसिद्ध आहे. शाहरूह खानला पद्मश्री पुरासकाराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. वांद्रे यथील मन्नत या बंगल्यामध्ये शाहरुख खान वास्तव्यास आहे. याशिवाय लंडनमध्ये देखील त्याचा एक आलिशान व प्रशस्त बंगला आहे. या व्यतिरिक्त दुबईमध्ये देखील शाहरुखचा आलिशान मोठा बंगला आहे, ज्याची किंमत जवळ जवळ १७ करोड असल्याचे सांगितले जाते.

3. अमिताभ बच्चन – आपल्या अद्वितीय अभिनयाने १९७०-८० चा काळ गाजवणारे अमिताभ बच्चन यांना फ्रेंच चित्रपटाच्या दिग्दर्शकाने “वन मॅन इंडस्ट्री” असे संबोधले होते. सर्वाधिक प्रभावी व यशस्वी अभिनेता म्हणून बिग बी प्रसिद्ध आहेत. जुहू मध्ये अमिताभ बच्चन यांचे ५ बंगले आहेत. जलसा, प्रतीक्षा, जनक, वत्स अशी त्यांची नावे आहेत. जलसा बांगला त्यांना रमेश सिप्पी या प्रसिद्ध दिग्दर्शकाने भेट म्हणून दिला. त्यांच्या सत्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी काम केले म्हणून तो बांगला त्यांनी अमिताभ यांना भेट म्हणून दिला. तर प्रतीक्षा हा त्यांनी स्वतः विकत घेतलेला बांगला आहे, तो जलसा बंगल्याच्या इथून १ किमी अंतरावर आहे. या व्यतिरिक्त बिग बी यांचे पॅरिसमध्ये एक प्रशस्त घर आहे, जे त्यांनी जया बच्चन यांना भेट म्हणून दिले आहे.

4. शिल्पा शेट्टी, राजकुंद्रा – शिल्पा शेट्टी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. तर तिचा पती हा ब्रिटिश-इंडियन बिझनेसमॅन आहे. यांची बाहेरच्या देशात खूप प्रॉपर्टी आहे. त्यांच्याकडे लंडन, इंग्लंड आणि कॅनडा मध्ये चार चार बंगले आहेत. आर इंग्लंड वेब्रिज या परिसरात असलेल्या त्यांचा बंगला अधिक आकर्षक व सुंदर आहे, व त्याची किंमत तब्बल १७० करोड इतकी आहे. इतकंच नव्हे तर राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टी साठी दुबईमधील प्रसिद्ध बिल्डिंग बुर्ज खलिफामध्ये एकी फ्लॅट भेट म्हणून दिला होता पण त्या फ्लॅटची जागा कमी असल्याने शिल्पा शेट्टीने तो फ्लॅट विकला.

5. सैफ अली खान, करीना कपूर – हिंदी चित्रपट सृष्टीतील यशस्वी हे दोन्ही कलाकार असून सैफ अली खानचे परंपरागत असलेला आलिशान, प्रशस्त पटौदी पॅलेस हरियाणा येथे आहे. त्याचसोबत त्यांचे मुंबई मध्ये देखील आलिशान घर आहे. यांच्या विदेशातील प्रॉपर्टी बद्दल सांगायचं झालं तर त्यांचं स्वित्झर्लंड मधील स्ताद या परिसरात आलिशान घर आहे.

6. जॉन अब्राहम – बॉलिवूड मध्ये अनेक जबरदस्त चित्रपट देत आपल्या अनोख्या अभिनय कौशल्याने सर्वांचा चाहता ठरलेला जॉन अब्राहम याचे मुंबई मधील वांद्रा येथे घर आहे. त्याशिवाय अमेरिका येथील लॉस एंजिलिस येथे जॉनचा बंगला आहे आणि हा बंगला लॉस एंजिलिसमधील प्रसिद्ध व पॉश परिसरातील आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *