बॉलिवुड चित्रपट हे त्यातील वेगवेगळे ट्विस्ट, मालमसाला, गाणी यांमुळे बॉक्सऑफिसवर नेहमीच सुपरहिट होत असतात. मात्र या सर्व गोष्टींना चारचांद लावतात ते त्यातील कलाकार. पण तुम्हाला माहित आहे का या कलाकारांचे आयुष्य सुद्धा सिनेमांप्रमाणेच ट्विस्ट असणारे असते. त्यांच्या आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. बॉलिवुडमध्ये एक काळ असा होता जेव्हा करीयर संपेल या भीतीने अभिनेत्री लग्न आणि मुले यांसारख्या गोष्टींपासुन दुर राहायच्या. तर चुकुन कोणी लग्न केलेच तर त्या ते लपवुन ठेवायच्या. मात्र आता वेळेनुसार या सिनेतारकांचे आयुष्य बदलले आहे.

आताच्या नव्या अभिनेत्री या त्यांच्या लग्नापासुन ते अगदी प्रेग्नंसीपर्यंत सर्व गोष्टी खुलेआम सांगतात. आई बनण्याच्या आधीच त्या त्यांचे बेबी बंप सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यातील काही अभिनेत्री तर लग्नाआधीच आई बनतात. तर काही लग्न न करताच आई बनतात.

1. गैब्रिएला डेमेट्रिएड्स – गैब्रिएला डेमेट्रिएड्स ही अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड आहे. ती एक मॉडेल आहे. तिने गेल्या वर्षीच एका मुलाला जन्म दिला. त्यांचा मुलगा आता एका वर्षाचा झाला आहे. विशेष म्हणजे ते दोघे एकत्रच राहतात परंतु त्यांनी अजुनही लग्न केलेले नाही.

2. नीना गुप्ता – नीना गुप्ता या सुद्धा एके काळी खुप चर्चेत असायच्या. त्यांनी त्यांच्या तरुणपणी वेस्टइंडीज क्रिकेटर विवियन रिचर्ड्सला डेट केले होते. असे म्हटले जाते कि नीना यांना लग्नापुर्वीच मुलगी मसाबाला जन्म दिला होता. मात्र नीना आणि विवियन रिचर्ड्स यांचे कधीच लग्न झाले नाही.

3. इशा शरवानी – अभिनेत्री इशा शरवानी ही सध्या चित्रपटांपासुन खुप दुर झाली आहे. तिला एक मुलगा असुन त्याचे नाव तिने लुका असे ठेवले आहे. इशा शरवानी ही सुद्धा एक सिंगल मदर आहे. ती अनेकदा तिच्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअऱ करत असते. इशा पहिल्यापेक्षा खुप वेगळी दिसते.

4. एमी जॅक्सन – एमी जॅक्सनने अनेक बॉलिवुड आणि साऊथकडील चित्रपटांमध्ये काम केले आहे. या सुंदर अभिनेत्रीला गेल्या वर्षीच तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज पानायियोटौ पासुन एक मुलगा झाला. या वर्षा ते दोघे लग्न करणार होते मात्र कोरोनाच्या महामारी मुळे ते लग्न पुढे ढकलण्यात आले. आता कदाचित ते पुढच्या वर्षी लग्न करण्याचा विचार करत आहेत.

5. कल्कि कोचलिन – बॉलिवुडमधील बिंधास्त अभिनेत्री म्हणुन कल्कि कोचलिनला ओळखले जाते. कल्किने गेल्या वर्षी एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी तिची व तिचा इजराइली क्लासिकल पियानिस्ट बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गची आहे. ते दोघे खुप काळ एकमेकांसोबत रिलेशन शीप मध्ये आहेत. मात्र अजुनही त्यांनी लग्न केले नाही. त्याआधी कल्कीचे निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत लग्न झाले होते. मात्र त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही.

6. माही गिल – अभिनेत्री माही गिलने काही वर्षी ती आई बनणार असल्याचा खुलासा केला होता. माही लग्न न करताच आई बनली होती. तिला एक मुलगी झाली. तिचे नाव वेरोनिका असे असुन ती आता तीन वर्षांची झाली आहे. माहीने सांगितले कि ती खुप काळ एका सोबत रिलेशनशीप मध्ये होती मात्र तिने अजुनही लग्न नाही केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *