“बाई वाड्यावर या” आणि “वाट बघतोय रिक्षावाला” या गाण्यांवर नृत्य करत प्रेक्षकांच्या मनात जिने घर केली ती अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. या दोन गाण्यांमुळे प्रसिद्ध होत तिने मराठी चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले. जबरदस्त, टार्गेट, कुटुंब, तीन बायका ऐका, मर्डर मिस्त्री अशा काही मराठी चित्रपटांमध्ये देखील मानसी नाईकने काम केले आहे. या व्यतिरिक्त चार दिवस सासूचे या गाजलेल्या मालिकेमध्ये देखील तिने काम केले आहे.

सध्या ती चित्रपट किंवा नृत्यांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांशी संवाद साधत असते. स्वतःच्या जीवनातील खाजगी असो व घडामोडी ती सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहता वर्गाच्या संपर्कात असते. हल्लीच तिने बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत बंधनात अडकली. लग्न व लग्नानंतरच्या सर्व समारंभाचे फोटो व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

मानसी स्वतःचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते, तर हल्लीच एका सोशल मीडिया युजरने तिच्या पोस्टवर अत्यंत घृणास्पद कमेंट केली आहे. पण मानसी नाईकने देखील या युजरची चांगलीच खरडपट्टी काढली. लाईव्ह सेशनमध्ये या कमेंट करणाऱ्या युजरची तिने चांगलीच शाळा घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by mardmarathi (@mardmarathi99)

” तू बुधवार पेठेतील रां** आहेस ” या कमेंटवर मानसी नाईक चिडली आणि तिने त्या युजरला म्हटले कि तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिले ? आणि तुम्ही तिथे काय करत होता ? तुम्ही मला बुधावर पेठेत कधी बघितले ? त्या स्त्रिया त्यांच्या पोटापाण्यासाठी त्या काम करतात. बुधावर पेठेत काम करणा-या महिला धाडस दाखवत कष्ट करतात, त्यांचे घर चालवण्यासाठी त्या छातीठोकुन प्रामाणिकपणे काम करतात, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्हीही काम करुन दाखवा बघू, असं म्हणत बुधवार पेठेत काम करणाऱ्या महिलांशी देखील तितक्याच आदराने वागले पाहिजे असे तिने सांगितले. या व्यतिरिक्त तिने जेव्हा प्रदीप खरेरा याच्याशी लग्न केले तेव्हा देखील तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. मराठी मुलगा लग्नासाठी भेटला नाही का? असे म्हणत काही युजर्सनी तिला ट्रोल केले.

मानसी नाईकचे हे उत्तर ऐकून सर्व सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि अशी कमेंट करणाऱ्या यूजर्सना हि एक चांगली चपराक बसलेय म्हणायला काही हरकत नाही आणि आम्हाला मानसी नाईकचा सार्थ अभिमान आहे.

सध्या सोशल मीडियामुळे सर्वांना मनाला वाटेल ते आणि हवं तसं काहीही पोस्ट करता येत, बोलता येतं. मागचा पुढचा कोणताही विचार न करता एखाद्या कलाकाराला ट्रोल करणं, त्याच्या खाजगी आयुष्यातील गोष्टींची चारचौघात वाच्यता करणं, त्यांच्या फोटोवर घाणेरड्या कमेंट करणं, त्यांच्या पेहरावाबद्दल बोलणं, एखादं पात्र नकारात्मक भूमिका साकारत असेल तर त्याला धमकीचे मेसेज करणं या सगळ्या गोष्टी सुरु असतात.

पण लोकांना हे कळत नाही की ते सुद्धा एक व्यक्ती आहेत त्यांना देखील त्रास होऊ शकतोच. सोशल मीडियाने आपल्याला जी व्यक्त होण्याची संधी दिली आहे, तिचा योग्य ठिकाणी वापर करा. काही वेळेस कलाकार सर्वांनाच उत्तर देऊ शकत नाहीत, पण काही कंमेंट इतक्या घाणेरड्या असतात कि कलाकार देखील शांत न रहाता उत्तर देतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *