सध्या सुरु असलेल्या इमली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असेलली लाडकी मराठी अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख. तिच्या या पात्राचे कौतुक होत आहे. यापूर्वी “खुलता कळी खुलेना” या मराठी मालिकेमध्ये काम करत ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. तिने काही मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे, ३१ दिवस, ग्रे, लग्न कल्लोळ या चित्रपटांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयासाठी तर ती चर्चेत असतेच पण तिच्या खाजगी आयुष्यातील घटनांमुळे देखील ती चर्चेत आली आहे.
जुलै २०२० मध्ये तिच्या नवऱ्याने म्हणजेच अभिनेता आशुतोष भाकरे याने राहत्या घरी ग*ळ*फा*स घेऊन आ*त्म*ह*त्या केली. तो गेले अनेक महिने तणावामध्ये असल्याने त्यातूनच त्याने आ*त्म*ह*त्या करत स्वतःची जीवनयात्रा संपवली. त्याच्या पश्च्यात बायको अभिनेत्री मयुरी देशमुख त्याचे आई बाबा व भाऊ असे कुटुंब आहे. अचानक घडलेल्या या घटनेने ती व कुटुंब दोघे प्रचंड त्रासातून गेले.
ऑगस्टमध्ये आशुतोषचा वाढदिवस असतो, त्या दिवशी तिने केकचा फोटो पोस्ट करत स्वतःच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तिच्या मनामध्ये उडालेला भावनांचा कल्लोळ त्या पोस्टच्या कॅप्शनद्वारे ते मांडत होती. त्याच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण जुलै महिनाभर तिने घरी केक बनवण्याचा प्रयत्न केला, जेणेंकरून आशुतोषच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला व छान केक तयार व्हावा.
आता पर्यंत बनवलेले सर्व केक त्याने टेस्ट केले होते आणि नेमका हाच केले खायला तो नाही, हा विचार तिच्या मनात सलत होता. सोबतच तिने त्याला काही प्रश्न देखील विचारले आहेत व आता तिथे अँजेल्सच एक हट्टीपणा करू नको असा प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.
महिन्याभरानंतर त्या दोघांच्याही श्वेता नामक मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व तिचे तिच्या मदतीसाठी आभार मानणारा एक व्हिडीओ देखील तिने शेयर केला. त्यांनतर शीतल ताई आमटे यांच्या आ*त्म*ह*त्या*नंतर पुन्हा एकदा मयुरी अशांत झाली. कारण, आशुतोष भाकरीच्या मृत्यूनंतर शिताताईंनी तिला धीर देत त्या तिच्यासोबत असल्याचे तिला सांगितले होते व आधार दिला होता.
सध्या या सगळ्यातून हळू हळू सावरू पाहते आहे. हल्लीच एका मुलाखतीत मयुरी म्हणाली, ” २०२० हे वर्ष माझ्यासाठी कठीण होतं. पण एका वेळेला मी ते पूर्ण वर्ष एका दिवसासारखं मानलं. कारण मी ज्या गोष्टींचा सामना करत होते त्यातून बाहेर पडणं. मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?” तिच्या या खंबीरपणाची व धाडसी निर्णयाची सर्वच जण दाद देत आहेत.
मयुरीने लिहिलेलं “डिअर आजो” हे नाटक आता प्रेक्षकांसाठी लवकरच प्रदर्शित होणार आहे. तिने हे नाटक तीन वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे. लेखिका मयुरी देशमुख लिखित असं हे तिचं पहिलं नाटक असून नाटक हे अमेरिकेत लहानाची मोठी झालेली नातं आणि भारतातील आजोबा यांच्या नात्यावर भाष्य करणारे आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !