२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या “सैराट” या मराठी चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करत विक्रम नोंदवला. या चित्रपटातील प्रत्येक छोटी गोष्ट जणू ट्रेंड झाली होती. चित्रपटातील संवाद असो, मोबाईलची रिंगटोन, रेल्वे जातानाचा त्यांचा डान्स, आर्चीचं बुलेट वरून फिरणं इत्यादी व अशा अनेक गोष्टी.

या चित्रपटाची गाणी जणू काही या चित्रपटातच आत्मा, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. झिंगाट हे गाणं तर लोकांच्या अधिक आवडीचं. नागराज मंजुळे दिग्दर्शित व अजय अतुल यांनी संगीत दिलेला हा प्रसिद्ध चित्रपट आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला.

आर्ची, परशा, सल्या, लंगड्या हि पात्रे तर प्रेक्षकांची सर्वाधिक आवडती आहेत. या चौघांसोबत अजून एक जण होती ती म्हणजे आर्चीची मैत्रीण आनी. या आनी चं पात्र अनुजा मुळे या अभिनेत्रीने साकारलं होतं. पुण्यामध्ये शिकत असताना अनुजाने एकांकिका स्पर्धेत भाग घेतला होता, या स्पर्धेतील ” चिट्ठी” नामक एकांकिकेतील तिच्या अभिनयासाठी तिला पारितोषिक मिळाले व तेव्हाच तिची आनी या पात्रासाठी निवड झाली. या चित्रपटानंतर इतर कोणत्याही चित्रपट वा मालिकेमध्ये तिने अद्याप काम केले नाही.

सर्वच जण हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असतात. आनी म्हणजेच अभिनेत्री अनुजा मुळे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. हल्लीच तिने ‘Ask Me Now’ हे सोशल मीडियावरचं फिचर वापरत आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

‘अनुजा सध्या काय करते’ असा एक प्रश्न तिच्या चाहत्याने विचारला असता तिने वकिलाच्या वेशातील एक फोटो पोस्ट करत वकिली असे उत्तर प्रश्न विचारणाऱ्यांना खाली दिले आहे. याच दरम्यान एका चाहत्याने पुढील प्रश्न विचारला की ‘तुझं शिक्षण किती झालं आहे?’ त्यावर ती म्हणाली कि तिने नुकतेच वकिलीमध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. इतर सहकलाकार हे अभिनय क्षेत्रात आपला जम बसवू पाहत असताना अनुजाने स्वतःसाठी एक वेगळा मार्ग निवडत तिने वकिली पेशात आपला जम बसवत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *