बॉलिवुडला अनेक सुपरहिट अभिनेते लाभले आहेत. काहींना या इंडस्ट्रीने आपलेसे केले तर काहींना काळानुरुप बाजुला सारले. म्हणजेच एके काळी सुपरस्टार म्हणुन ओळखले जाणारे अभिनेते आता पडद्या आड झाले आहेत. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे सुनिल शेट्टी…

सुनिल शेट्टी ९० च्या दशकात अॅक्शन हिरो म्हणुन ओळखला जायचा. सुनिल शेट्टी यांनी बॉलिवुडमध्ये ‘बॉर्डर’, ‘कांटे’, ‘धड़कन’, ‘हेरा फेरी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. मात्र सध्याच्या काळात सुनिल शेट्टी हे नाव केवळ नावापुरतेच बाकी राहिले असे म्हटल्यास हरकत नाही. करियरच्या इतक्या वर्षांनंतर सुनिल शेट्टी यांचे म्हणणे आहे की त्यांनी केलेल्या काही चुकांमुळे ते आज अक्षय कुमार. अजय देवगण, सलमान खान यांच्यासारखे काम करु शकत नाही. काही दिवसांपुर्वी झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या चुकांची पुष्टी केली.

सुनिल शेट्टी यांनी त्यांच्या इंटरव्ह्युमध्ये सांगितले की एक सुनिल शेट्टी होतो ज्याचा विषयावर जास्त विश्वास असल्याने तो मार्केटींग मध्ये मागे पडला. सुनिल ने पुढे सांगितले कि मी टाइपकास्ट आहे ही माझी अडचण मुळीच नाही. तर मी नेहमी सुरक्षित राहिलो ही माझी अडचण आहे. तुम्ही जर नेहमी काही लोकांसोबतच काम केलात किंवा एकाच दिग्दर्शकासोबत कायम काम करत राहिलात तर तुमच्यात निर्णय क्षमता नाही असा अर्थ होतो.

त्यांनी पुढे सांगितले कि जर तुम्ही तुमच्या अदाकारी सोबत रिस्क घेतली नाही तर तुम्हाला स्वताची एक स्टाइल बनवावी लागते. माझ्यासोबतचे अक्षय आणि अजय हे आज देखील यशस्वी तारे बनुन चमकत आहेत. मी माझ्या करियर मध्ये कधीच स्वताची मार्केटींग केली नाही मात्र माझ्यासोबतच्या कलाकारांनी यावर खुप काम केले त्यामुळे ते आता माझ्यापेक्षा खुप पुढे आहेत. आजच्या काळात अक्षय कुमार किंवा अजय देवगण सोबत कोणीही ५०० करोड रुपयांचा चित्रपट तयार करण्यास सहज तयार होईल पण हेच जर माझ्यासोबत ५० करोडचा जरी सिनेमा बनवायचा असेल तर ते काही वेळा त्यावर विचार करतील.

त्यानंतर सुनिल शेट्टी यांनी म्हटले की बॉलिवुडमधील माझ्या प्रवासाचा फायदा माझ्या मुलाला नक्कीच होईल कारण तो बॉलिवुडमध्ये एण्ट्री घेण्यासाठी पुर्णपणे तयार आहे. मी माझ्या करियरमधल्या चुकांवरुन जे काही शिकलो ते माझ्या मुलाचे करियर बनवण्यासाठी नक्कीच कामी येईल.

सुनिल शेट्टी यांना सध्याच्या कलाकारांपैकी आयुषमान खुराना आणि टायगर श्रोफचे खुप कौतुक केले. त्यांनी म्हटले कि मी जेव्हा टायगर आणि आयुषमानचे काम पाहतो तेव्हा मला त्यांचे काम पाहुन खुप छान वाटते. बॉलिवुडमध्ये येणारी प्रत्येक जनरेशन या काळानुरुप नवे नवे प्रयोग करत असतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *