बॉलिवुड अभिनेता सलमान खानची मोहिनी कित्येक वर्षे प्रेक्षकांवर कयम आहे. त्याची स्टाइल, अभिनय, डान्स या सर्व गोष्टी प्रेक्षकांना नेहमीच भुल घालत असतात. त्यामुळे सलमान खानचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर सिनेमागृहा बाहेर झुंबड उडाली असते. आता पुन्हा एकदा सलमान त्याचा नवा कोरा चित्रपट घेऊन सज्ज झाला आहे.

काही दिवसांपुर्वीच सलमानच्या राधे या नवा कोऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्या ट्रेलरला प्रेक्षकांच्या समिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. या ट्रेलरवरुन असे दिसुन येते कि राधे हा चित्रपट सलमानच्या आधीच्या चित्रपटांमधील गाजलेले डायलॉग घेऊन तयार करण्यात आला आहे. या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेला सलमान आणि दिशाचा किसिंग सीन मात्र सध्या सर्वत्र खुप चर्चेत आहे. तो सीन पाहुन सध्या अनेक जण सलमान खानला ५५ वर्षांचा होऊन देखील आपल्याहुन अर्ध्या वयाच्या मुलीला कसे किस करु शकतो असे म्हणत ट्रोल केले आहे. सततच्या होणाऱ्या ट्रोलिंगला आता सलमानने त्याच्या भाषेत उत्तर दिले आहे.

राधे या चित्रपटात दिशा पटाणी आणि जॅकलिन फर्णांडिस या दोन अभिनेत्री आहेत ते ट्रेलर मध्ये सगळ्यांनी पाहिले असेल. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्री सलमानहुन अर्ध्या वयाच्या आहेत. सध्या सलमानचे वय ५५ वर्षे आहे. तो या चित्रपटाचा नायक असल्यामुळे साहाजिकच तो दिशा आणि जॅकलिन सोबत रोमान्स करताना दिसतो. मात्र काही प्रेक्षकांना सलमानचे असे रोमान्स करणे आवडलेले दिसत नाही. काहींनी तर तु वडिलांच्या वया झाला आहेस त्यामुळे तु आता म्हाताऱ्या भुमिका कर अशा टीका करत आहेत.

नुकताच राधे या चित्रपटाचा अधिकृत ऑफस्क्रिन व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या बीहाइण्ड द सीन्सच्या व्हिडीओमध्ये सलमानने त्याला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले. सलमानने म्हटले कि मी दिशा किंवा जॅकलिनच्या वयाचा नाही तर त्या माझ्या वयाच्या आहेत. त्यामुळे असे प्रश्न मला आता विचारु नका.

सलमान दरवेळी इदच्या मुहुर्तावर त्याचे चित्रपट प्रदर्शित करत असतो मात्र सध्या संपुर्ण जगावर कोरोनाचे सावट असल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन दोनदा पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. राधे हा चित्रपट १३ मे रोजी ZEE Plex आणि ZEE 5 वर प्रदर्शित होणार आहे. सलमानचा चित्रपट म्हटलं की लोक थिएटरमध्ये गर्दी करु शकतात. “कोरोनामुळं सध्या घराबाहेर पडणं धोक्याचं आहे. अन् सुरक्षेच्या दृष्टीनं गर्दी टाळण्यासाठी OTT वर प्रदर्शित करण्याचा निर्णय आम्ही घेतला” असा दावा सलमान खाननं केला आहे. हा चित्रपट सलमानच्याच वॉण्टेड चित्रपटाचा सिक्वेल असल्याचे म्हटले जाते.

या चित्रपटाचत सलमान एक सुपरकॉप आहे हे ट्रेलर वरुन दिसुन येते. या सुपर कॉपची काम करण्याची स्वताची अशी एक वेगळी पद्धत असते. मुंबईतील ड्रग्सचा बिझनेसचा बॉस रणदुप हुड्डा असतो. त्याचा बिझनेस मुंबईत खुप जोर धरु लागलेला असतो. त्यामुळे सलमानना म्हणजेच राधे ला त्याचे सिनियर या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी बोलवुन घेतात. या चित्रपटातील सलमानच्या चालण्या फिरण्याचा अंदाज, डायलॉग फेकीची पद्धत या सर्वांवरुन तो १२ वर्षांपुर्वीच्या वॉण्टेडमधला राधे असल्याचे समजुन येते. या चित्रपटात जॅकी श्रॉफ सलमान खानचे सिनीयर दाखवले आहेत तर दिशा पठाणी जॅकी श्रॉफची मुलगी आणि सलमानची गर्लफ्रेंड दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रभुदेवाने दिग्दर्शित केला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *