सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असताना अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्यांना अनेक वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहेत. त्यातीलच एक मोठी समस्या म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची पातळी घटणे. सध्या सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तो बाहेरुन मागवण्याची वेळ आली आहे. महानगरपालिका अधिकारी या काळात घरोघरी जाऊन ऑक्सिजनची मात्रा तपासत आहेत. आज आम्ही तुम्हाला शरीरातील ऑक्सिजनची कमी कशी ओळखावी… त्यांची लक्षण कोणती ते सांगणार आहोत.
कोरोनासोबतच हायपोक्सिया या आजारामुळे सुद्धा शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते. हायपोक्सिया म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होणे. जेव्हा शरीरातील पेशींना, उतींना आणि शरीरांतर्गत अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा हा आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो किंवा र*क्ताभिसरण क्रिया नीट होत नाही. शरीरातील र*क्ताभिसरणाची क्रिया नीट चालली आहे की नाही हे पाहण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर या उपकराणाचा वापर केला जातो.
ही आहेत हायपोक्सियाची लक्षणे – या आजारामुळे माणसाला धाप लागते. श्वास कोंडल्यासारखा होतो. आणि नंतर त्याचे प्रमाण हळुहळु वाढत जाते. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुमच्या सुद्धा र*क्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे असे समजावे. ९५% एवढ्या मात्रेत ऑक्सिजन जर आपल्या शरीरात असेल तर आपले शरीर निरोगी असते. पण तीच मात्रा जर ९० पेक्षा कमी झाली तर ते शरीरासाठी घातक असते. शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्यास डॉक्टर कृत्रिम ऑक्सिजन देऊन ती वाढवतात. मात्र तसे करण्यास सुद्धा मर्यादा असते. पण सध्या कृत्रिम ऑक्सिजनचा पण तुटवडा आहे.
नैसर्गिक प्रकारे वाढवा ऑक्सिजनची मात्रा – कडुनिंब, पिंपळ, पोफळी, मनीप्लांट, स्नेक प्लांट जरबेरा यांसारख्या झाडांची आपल्या घरात किंवा घराच्या आजुबाजुच्या परिसरात लागवड करा. या झाडांमुळे मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. ताणतणावाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मनान प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा. योगा, प्राणायाम , मेडीटेशन करा. व्यायामाने शरीर सुदृढ राहते. ऑक्सिजनची मात्रा लेव्हल मध्ये राहते.
नेहमी सकारात्मक विचार करा. इतर व्यायाम करण्यास अडचणी येत असतील तर चालणे हा सर्वात सोप्पा व्यायाम आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. नेहमी भरपुर पाणी प्या. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. सकस आहार घ्यावा. ताज्या भाज्या, उकडलेली कडधान्ये, हिरव्या शेंगांच्या भाज्या खाव्यात. शिजवलेला बटाटा लीनची पाने यात प्रोटीन असतात. त्याचा फायदा होतो. मिठाचा मर्यादित प्रमाणात वापर करा. त्यामुळे उच्च र*क्तदाब कमी होऊ शकतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.