सोशल मीडिया म्हटलं की वेगवगळे प्लॅटफॉर्म मग त्यावरील नवीन फीचर्स या गोष्टी आल्याचं. त्याचप्रमाणे इंस्टाग्रामवरील रिल्स हे फिचर सार्वधिक ट्रेंड होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात नेटकरी हे फिचर वापरून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य, मिम्स, गाणी, वाद्य अशा सर्वच प्रकारे ३० सेकंदाचे हे रिल्स असतात. कलाकार असोत किंवा इन्फ्लुएन्सर्स सर्वच जण यावर सक्रिय असतात.
सोशल मीडियावर कोणता ना कोणता व्हिडीओ हा तुफान व्हायरल होत असतो. तर असाच एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वतःच लग्न असलेल्या मंडपात नवरीने “मेरे सैयां सुपरस्टार” या गाण्यावर नाचत नाचत एंट्री घेतली होती. हा व्हिडीओ सर्वांनीच अगदी उचलून धरला होता. प्रत्येक जण या व्हिडिओवर काही ना काही कमेंट करत होते. तिचं नाव होतं, श्वेता ताजणे शिंदे ती मूळची पुण्याची आहे. तिचं ३० नोव्हेंबरला संकेत शिंदे नावाच्या मुलाशी लग्न झालं.
View this post on Instagram
त्याचवेळी लाजणाऱ्या नवरीचा पायंडा तोडत सर्वांनाच सरप्राईज देत तिने नाचत आपल्या होणाऱ्या नवऱ्याला आनंद देण्यासाठी एंट्री घेतली. हे पाहून तिच्या नवऱ्याने तर तिची दृष्टच काढली होती. सध्या तिच्या रिल्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. वेगवेगळ्या गाण्यांवर ती नृत्य करत त्याचे व्हिडीओ ती इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक रिल्सला नेटकऱ्यांचा जबरदस्त प्रतिसाद असतो.
एकदा का मुलीचं लग्न झालं कि चूल आणि मूल एवढंच तिचं जग असतं, असं पूर्वीपासून म्हणत आले आहेत. सासरची घरातील लोकांची उठबस करणे, सर्वांची मर्जी राखणे आणि आदर्श सुनेसारखं राहणे इतकंच तिने करायचं असत. मुलींना स्वतःचे छंद जोपासणं देखील काही वेळेस शक्य होत नाही. पण हल्लीचा काळ बदलताना दिसत आहे.
काही ठिकाणी मुली या मनमोकळेपणाने देखील आपल्या सासरी आपलं माहेरचं असल्यासारख्या वागतात, पण मुळात माहेरी देखील तशी मनमोकळी वागणूक मिळावी लागते. याबाबतीत श्वेता अगदी लक्की आहे. लग्नानंतर देखील आपल्या नृत्याची आवड जोपासताना दिसत आहे आणि यासाठी तिच्या कुटुंबाचा तिला पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसत आहे.
View this post on Instagram
अस्सल मराठमोळ्या लावण्यांवर तिचे अदाकारी नृत्य ती सादर करत असते. “मला म्हणत्यात हो पुण्याची मैना” या गाण्यावरचा तिचा व्हिडीओ सर्वाधिक व्ह्यू असणारा व सर्वाधिक प्रसिद्ध झालेला व्हिडीओ आहे. तिच्या या व्हिडीओला ४.५ लाखाच्या आसपास व्ह्यू मिळाले आहेत. साडी नेसून मला म्हणतायत ओ पुण्याची मैना या गाण्यावर नृत्य करत “मी आहेच पुण्याची” असे कॅप्शन खाली तिने या व्हिडीओला दिले आहे. श्वेताप्रमाणेच इतर देखील सर्व मुलींनी आपले छंद जोपासावेत व आपल्या कला गुणांना वाव देत अशीच प्रगती करत राहावी.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !