इंस्टाग्रामवरील रिल्स या फीचरमुळे अनेक वेगवेगळे डान्सचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत असतात. या रिल्स तयार करण्यात तर आपले कलाकार देखील मागे राहिले नाहीत. ते देखील आपल्या सहकलाकारांसोबत किंवा पार्टनर्ससोबत हे रिल्स तयार करून शेयर करत असतात. चाहते या रिल्स डोक्यावर घेत त्या तुफान व्हायरल होत आहेत. तर अशाच दोन कलाकारांच्या काही रिल्स हल्ली सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे दोन्ही कलाकार आपल्या आवडत्या मालिकांमधील आहेत. “लागीरं झालं जी” फेम आज्या म्हणजेच नितीश चव्हाण आणि “राजा राणीची गं जोडी” मधील मोना म्हणजेच श्वेता खरात.

नितीश हा झी मराठीवरील २०१७ मध्ये सुरु झालेल्या ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून मुख्य अभिनेता म्हणून काम करत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या मालिकेत आर्मीमधील जवानाची भूमिका साकारली होती. सोबतच या मालिकेमध्ये आज्या आणि शीतलची (शिवानी बावकर) अफलातून प्रेमकहाणी देखील पाहायला मिळाली होती.

नितीश हा मूळचा साताऱ्याचा आहे. अभिनयासोबतच त्याला नृत्याची आवड असून त्याची एक स्वतःची डान्स अकॅडेमी साताऱ्यामध्ये आहे. अजिंक्यने काही नाटकांमध्ये देखील काम केले आहे. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. स्वतःचे डान्सचे व्हिडीओ, रिल्स तो शेयर करत असतो.

कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेत मुख्य अभिनेत्री संजीवनी (शिवानी सोनार) हिच्या खास मैत्रिणीची भूमिका साकारणारी मोना म्हणजेच श्वेता खरात. श्वेता देखील मूळची साताऱ्याची असून ती स्वतःचा अभ्यास सांभाळत अभिनयासाठी ऑडिशन देत होती आणि त्याचवेळी ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेसाठी तिने ऑडिशन देताच तिची मोना या भूमिकेसाठी निवड झाली. या मालिकेच्या प्रोमोपासूनच श्वेता प्रेक्षकांच्या चांगलीच परिचयाची झाली होती. श्वेताने “तुला पण बाशिंग बांधायचंय” या चित्रपटात काम केले होते व हल्लीच तिने “घेतला वसा टाकू नको” या मालिकेत भगवान शंकरच्या पौराणिक कथेतील देवी महालक्ष्मीची भूमिका साकारली होती.

सातारा, कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या शूटींगमुळे तेथील स्थानिक कलाकारांना या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळते. नितीश चव्हाण, श्वेता खरात हे देखील मूळचे साताऱ्याचे असून तेथे चित्रित होणाऱ्या मालिकांमुळे तेथील स्थानिक कलाकारांना आपला अभिनय दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

याआधी देखील नितीशच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये श्वेता दिसत असे. “रुपेरी वाळूत” या गाण्यावरील त्या दोघांच्या रिल्सला सर्वाधिक व्ह्यू मिळाले आहेत व प्रेक्षकांच्या आग्रहाखातर त्या दोघांनी हा व्हिडीओ शूट करून पोस्ट केला होता. या दोघांचे अफेयर सुरु असल्याच्या चर्चा देखील देखील रंगत आहेत, पण यावर कोणीही स्पष्ट बोललं नाही. सध्या तरी ते दोघे चांगले मित्र आहेत अस्सं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे सध्या तरी चाहते या दोघांचे रिल्स एन्जॉय करत आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *