लातूरमधील बाभळगावचे सरपंच ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अशी राजकीय कारकीर्द असणारे सर्वांचे लाडके राजकारणी म्हणजे विलासराव देशमुख. वैशालीताई देशमुख व विलासरावांना ३ पुत्र आहेत आणि हे तिन्ही पुत्र आपापल्या क्षेत्रामध्ये आपले नाव कोरून ठेवलंआहे. अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख अशी त्यांच्या नावे आहेत. ज्येष्ठ पुत्र व धाकटे पुत्र यांनी राजकीय क्षेत्रात आपली पकड मजबूत केली आहे तर द्वितीय पुत्र अभिनयक्षेत्रात आहेत. अमित देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री या पदाचा पदभार आहे. रितेश देशमुख बॉलिवूड तसेच मराठी मराठी चित्रपटातील अभिनेता आहे. धीरज देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत पहिल्याच लढ्यात आमदार पद मिळवले आहे. हे तिघे ही विवाहित असून त्यांच्या पत्नी या चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहेत.

अमित देशमुख – अदिती प्रताप – २०२० सालचे महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्याचे विद्यमान मंत्री म्हणून पद भूषवित आहेत. लातूर शहर विधानसभा मतदार संघाकडून ते निवडून आले होते. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. २००२ ते २००८दरम्यान ते काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष होते. २००९ मध्ये लातूर शहराकडून निवडणूक लढवत बहुजन विकास आघाडीच्या व शिवसेनेच्या बड्या नेत्यांचा पराभव करत ते निवडून आले. ते तब्बल ८९ हजार ४८० इतक्या मतांनी म्हणजेच त्या काळात राज्यातील चौथ्या क्रमांकाचे विक्रमी मताधिक्य मिळवले. २००९ पासून ती लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेसकडून लातूर शहराचे आमदार झाले आहेत. त्यांनी अल्पावधीसाठी २०१४ मध्ये महसूल, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्रिपद सांभाळले होते.

अदिती प्रताप या एक अभिनेत्री आहेत. अदिती यांचं बालपण बंगळूर आणि दिल्लीतील असून आपली अभिनयाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी मनोरंजन विश्व असलेली मुंबई गाठली. त्यांना सात फेरे या मालिकेतून आपल्या अभिनयासाठीचा पहिला ब्रेक मिळाला. त्यांनी ७ वर्षे अभिनय व मॉडेलिंग केले. मान या मालिकेमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. तर या मिस्टिक लव्ह स्टोरी नामक चित्रपटामध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे. २००८ साली अदिती व अमित देशमुख यांचा विवाह झाला. अनेकांना असं वाटतं होतं कि यांचा प्रेमविवाह असावा पण आमच्या कुटुंबीयांनी हे लग्न ठरवलं असल्याचे अदिती यांनी सांगितले आहे. या दोघांना अवीर व अवान अशी २ मुले आहेत.

धीरज देशमुख – दीपशिखा भगनानी – पहिल्याच निवडणुकीत यश प्राप्त करत धीरज देशमुख हे लातूर विधानसभा मतदारसांघाचे आमदार म्हणून पदभार स्वीकारला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये १,२१,४८२ इतक्या मतांच्या तिसऱ्या सर्वाधिक अंतराने विजेतेपद मिळवले. २०१४ – २०१९ या कालावधीमध्ये ते लातूरच्या जिल्हा परिषदेचे सदस्य होते.
२०१२ मध्ये धीरज देशमुख हे दीपशिखा भगनानी यांच्याशी विवाहबद्ध झाले. दीपशिखा या चित्रपट निर्मात्या आहेत. पूजा एंटरटेनमेंट या चित्रपट निर्मिती कंपनी अंतर्गत अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. दीपशिखा देशमुख या ज्येष्ठ व प्रसिद्ध चित्रपट निर्माते वासू भगनानी यांच्या कन्या आहेत व जॅकी भगनानी यांची बहीण आहे.

दीपशिखा यांनी म*दा*री, सर्वांना, वेलकम टू न्यूयॉर्क, जवानी जानेमन, कुली नंबर वन द रिमेक, दिल जंगली अशा चित्रपटांच्या निर्मात्या म्हणून दीपशिखा यांनी काम केले आहे. ऐश्वर्या बच्चन व रणदीप हुडा यांची भूमिका असलेल्या सरबजीत या चित्रपटापासून दीपशिखाने निर्माती म्हणून सुरुवात केली. गणपत आणि बेलबॉटम हे दीपशिखा यांचे आगामी चित्रपट आहेत. यासोबतच दीपशिखा यांनी लव्ह ऑर्गेनिकली (Love Organically) या स्किनकेयर ब्रँडची देखील स्थापना केली आहे. दीपशिखा या पती धीरज यांच्यासोबत ग्रामीण भागांमधील शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी काम करतात. पॉवर वुमन, यंग एन्टरप्रिन्युअर अशा व इतर अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. दीपशिखा व धीरज देशमुख यांना दिवीयाना आणि वंश अशी २ मुले आहेत.

रितेश देशमुख – जेनेलिया देशमुख – बॉलिवूडमधील यशस्वी जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे रितेश आणि जेनेलिया. या दोघांची प्रेमकहाणी तर सर्वश्रुत आहेच. रितेश अभिनेता आहेच त्यासोबतच तो वास्तुकार आणि निर्माता देखील आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी क्या कूल है हम, ब्ल*फ*मास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, दे ताली, हाउसफुल, डबल धमाल, तेरे नाल लव हो गया, हाउसफुल२, क्या सुपर कुल है हम, ग्रॅं*ड म*स्ती अशा यशस्वी चित्रपटांत त्यांनी काम केले. रितेश यांना विनोदी भूमिका साकारल्यानंतर त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. एक व्हिलन चित्रपटातील त्यांची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडली. बालक – पालक या मराठी चित्रपटाची निर्मिती करत व लय भारी या मराठी चित्रपटात अभिनय करत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

जेनेलिया तेलगू चित्रपटातील एक आघाडीची अभिनेत्री असून तामिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. म*स्ती, फोर्स, तेरे नाल लव हो गया, जाणे तू या जाने ना अशा काही प्रसिद्ध हिंदी चित्रपटांत तिने काम केले आहे. लय भारी या मराठी चित्रपटाच्या निर्मात्या म्हणून जेनेलिया यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. यासोबतच जेनेलिया या काही ब्रँड्सच्या ब्रँड अँबेसेडर देखील होत्या. २००२ पासून हे रितेश आणि जेनेलिया एकमेकांना डेट करत होते. २०१२ मध्ये ते दोघे हि विवाहबंधनात अडकले. राहील आणि रिहान अशी २ मुले त्यांना आहेत. दोघे हि सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि विविध रिल्स व व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. एकमेकांपासून कामानिमित्त देशमुख कुटुंबीय दूर असलं तरीही त्यांच्या प्रेमाचा गोडवा मात्र कायम तसाच आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *