आपल्या जीवनांतील सर्वात सोनेरी क्षण कोणते असतील तर ते म्हणजे आपलं बालपण! बालपण किती सुंदर असता, कोणती जबाबदारी नाही की कोणत्या गोष्टीचा ताण नाही. फक्त मनसोक्त हसणं, खेळणं, बागडणं इतकंच आणि आपलं हे बालपण आपल्य्यासोबत आपले आई- वडील देखील जगात असतात सोबत आपल्या लहानपणीच्या आठवणी देखील ते जतन करून ठेवत असतात. प्रत्येकाला आपलं बालपण प्रिय असतं आणि प्रत्येकजन ते जपत हि असतो. बालपणीचे फोटो बघताच तर आपल्या चेहऱ्यावरून अगदी एक स्मितहास्य उमटून जातं. तर असाच एक बालपणीचा फोटो आपल्या एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्री पूजा सावंत हिने हा तिच्या लहानपणीच फोटो पोस्ट केला आहे. आपल्या आई बाबांसोबतचा हा गोंडस फोटो तिच्या चाहत्यांना परत प्रेत पडायला भाग पाडत आहे. वेगेवगेळ्या धाटणीच्या भूमिका लीलया पेलत तिने तिचे अभिनय कौशल दाखवले आहे. लहानपणापासूनच पूजाला अभिनय आणि नृत्याची आवड होती आणि टाय ती आवड जोपासत फार लहान वयात पूजाने यशाला गवसणी घातली. लहानपणापासूनच विविध नाटकात आणि नृत्यांमध्ये भाग घेत तिने पुरस्कार पटकावले.

२००८ मध्ये पूजाने महाराष्ट्र टाइम्सच्या “श्रावण क्वीन” या कार्यक्रमात सहभागी झाली होती, सोबतच तिने २००८ चा श्रवण क्वीनचा मन देखील पटकावला. त्यावेळेस या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सचेत पाटील होते. सचेत यांनी तिला २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्टिस्टारर “क्षणभर विश्रांती” या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. जबरदस्त कलाकार असताना देखील पूजा देखील या चित्रपटात तिच्या अभिनयामुळे तितकीच उठून दिसत होती.

या चित्रपटानंतर पूजाला अनेक चित्रपट मिळाले. झक्कास, सतरंगी रे, पोश्टर बॉईज, निळकंठ मास्टर, भेटली तू पुन्हा या व अशा असंख्य चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. २०१७ मध्ये “लपाछपी” नावाच्या एका रहस्यमयी विषयक चित्रपटामध्ये तिने काम केले आणि या चित्रपटातलं तिच्या अभिनयासाठी तिला दादासाहेब फाळके सर्वोत्त्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला.

फक्त चित्रपटच नव्हे तर टीव्हीवरील रियॅलिटी शोमध्ये देखील ती झळकली आहे. बुगी वूगी, एका पेक्षा एक जोडीचा मामला अशा काही कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला आहे. झी टॉकीजवरील वाजले इ बारा या कार्यक्रमाची ती सूत्रसंचालक होती. सोनी मराठीवरील महाराष्ट्र बेस्ट डान्सर या कार्यक्रमाची ती परीक्षक देखील आहे.
बाली, दगडी चाळ, आणि लव्ह यु मित्र हे पूजाचे आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *