अखेर सलमान खान लग्न का करत नाही याचे कारण त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले !

158

बॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये “प्रेम” नावाने अनेक भूमिका पार पडणारा अभिनेता म्हणजे सलमान खान. मैने प्यार किया या हिंदी चित्रपटातून व्यावसायिक यश मिळवत सलमानने आजतागायत अनेक विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे. सलमान खान नेहमीच त्याचा अभिनय व त्याच्या खाजगी आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. सलमानचं लग्न हा एक मोठा चर्चेचा विषय असतोच.

सलमानच्या लग्नाची घाई ही त्याच्या चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच आहे. घरचे तर फार काळापासून त्याच्या लग्नासाठी वाट बघत आहेत. सलमानच्या आई यांना सलमानचं लग्न झालेलं व त्याचा सुखी संसार डोळ्यांदेखत बघण्याची त्यांची इच्छा आहे, हि इच्छा त्यांनी अनेकदा व्यक्त करून देखील दाखवली आहे. पण सलमानच्या व्यस्ततेमुळे लग्न या मुद्द्याकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळच नाही.

सलमानला व त्याच्या घरच्यांना अनेकदा सलमान खानच्या लग्नाविषयी विचारणा केली जाते. परंतु सलमान खान नेहमी या प्रश्नाचे उडवा उडवीचे उत्तर देतो. पण यावेळेस सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या प्रश्नावर उत्तर देत सलमान खानच्या लग्न न करण्यामागील सत्य सांगितले आहे.

सलीम खान म्हणले की, सलमान ज्यावेळेस एखाद्या चित्रपटामध्ये नव्या अभिनेत्रीसोबत काम करतो, तेव्हा त्या चित्रपटातील अभिनेत्रींच्या प्रेमात पडतो. अभिनय क्षेत्रातील प्रत्येक कलाकारांचे हे स्वप्न असते की आपण या संक्षेत्रामध्ये अधिकाधिक यशस्वी व्हावे. तसेच या हित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींचे देखील स्वप्न असते कि आपण खूप प्रसिद्धी मिळवावी व आपल्या क्षेत्रात यशस्वी व्हावे.

सलीम खान पुढे म्हणाले, सलमान जेव्हा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो तेव्हा तिच्यामध्ये तो स्वतःच्या आईला शोधत असतो. याच कारण असं की, सलमान अशा एका मुलीसोबत लग्न करू इच्छितो, जी त्याच्या आईसारखी असेल, घरातील कामे करेल, मुलांना सांभाळेल, त्यांचा अभ्यास घेईल. अशाप्रकारच्या घरंदाज मुलीशी सलमान लग्न करायचे आहे. परंतु अशी मुलगी सलमानला अद्याप काही भेटली नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !