“मोहबत्ते लूटाऊंगा” गाणं ऐकताच एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे अभिजीत सावंत. “इंडियन आयडल” हा सर्वाधिक लोकप्रिय व मानला जाणारा गाण्याचा कार्यक्रम आहे. आपल्या गाण्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा अभिजित सावंत ठरला. इतकेच नव्हे तर क्लिनिक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टार ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावले. सोनी वाहिनीने अभिजित सावंत याचा म्युझिक अल्बम लाँच केला होता. “आपका अभिजीत” या अल्बमद्वारे अनेक गाणी त्याने गायली आहेत. त्याचं वर्षी आशिक बनाया आपने या चित्रपटाच्या ‘मरजावा मिटजावा’ हे गाणं गायलं.

अभिजित सावंत याच्या गाण्यांमुळे त्याची प्रसिद्धी फारच वाढली होती, त्यामुळे आता बॉलिवूडच्या संगीत क्षेत्राला एक नवा व मनमोहक आवाज मिळणार अशी जणू सर्वांचीच खात्री झाली, इंडियन आयडलच्या यशानंतर काही गाण्यांना अभिजीतने स्वतःचा आवाज देखील दिला, पण काळ जसा पुढे सरकत गेला तसं हे नाव काळाच्या पडद्यामागे दिसेनासं होतं गेलं.
मनाचा ठाव घेणारा आवाज असून देखील अभिजीतला बॉलीवूडमध्ये गाण्याची संधी का नाही मिळाली? या प्रश्नावर स्वतः अभिजीतने उत्तर दिले आहे.

बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजीतनं या प्रश्नासमवेत आपल्या करिअरवर भाष्य केलं आणि त्याच्या उत्तरातून बॉलिवूडचं भयाण वास्तव जगासमोर आलं. तो म्हणाला, “आपली ही इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणं बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडलं.

इंडियन आयडल जिंकल्यावर माझा प्रवास सुरु झाला. गेल्या 15 वर्षांच्या काळात अनेकांनी मला रिजेक्ट केलं. कारण मी त्यांच्या गटातील गायक नव्हतो. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळं त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही.”

वरील सर्व प्रकारामुळे अभिजित बॉलिवूड आणि टीव्हीपासून दूर आहे. तो परदेशांमध्ये आपल्या गाण्यांचे शो करत असतो. चित्रपट किंवा कोणताही अल्बमसाठी गाण्यापेक्षा अभिजीतने लाईव्ह शो करण्यावर अधिक भर दिला आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *