बॉलिवुडकर म्हटलं की फॅशन फिटनेस हे आपसुकच येत. बॉलिवुडमधील प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत जीम , डाएट या्ंसारख्या गोष्टी करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांनासुद्धा त्यांचा फिटनेस प्लॅन जाणुन घेण्याची नेहमीच इच्छा असते. पॉ*र्न*स्टा*र ते बॉलिवुडमधील यशस्वी अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लियोनी नुकतीच ४० वर्षांची झाली. १३ मे १९८१ ला सर्निया ओंटारिया, कॅनाडा येथे सनीचा जन्म झाला. करनजीत कौर वोहरा असे सनीचे खरे नाव आहे.

सनीने २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या जिस्म २ मधुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपट केले. मिळालेल्या माहितीनुसार सनी ११७ करोड रुपयांची मालकिण आहे. सनी जितकी तिच्या चित्रपटांमध्ये अॅक्टीव्ह असते तितकीच ती तिच्या फिटनेसकडे सुद्धा कडक लक्ष देते. त्यामुळेच ती तिच्या मुळ वयाहुन कमी वयाची व नैसर्गिक सौंदर्यवती दिसते. आज आम्ही तुम्हाला सनीचे फिटनेसच रहस्य सांगणार आहोत.

सनीने तिच्या अनेक इंचरव्ह्युमध्ये सांगितले आहे ती तिच्या फिटनेस कडे खुप लक्ष देते. त्यासाठी ती पौष्टीक आहार सुद्धा घेते. सनी इंडस्ट्रीमध्ये बोल्ड ब्युटी म्हणुन ओळखली जाते. सनीचे म्हणणे आहे की बोल्ड ब्युटीसाठी हेल्दी लाइफस्टाइल असणे गरजेचे आहे. सनीला तीन मुलं आहेत. ती तिच्या तिन्ही मुलांचा सांभाळसुद्धा स्वता करते व सोबतच स्वता:च्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देते.

खरे तर सनी ४० वर्षांची आहे मात्र तिची सतेज आणि नितळ त्वचा व फिगर पाहता ती २० वर्षांहुन पण कमी वयाची वाटते. फिटनेस साठी ती नेहमी वर्कआऊट आणि योगा करते. सनी रोज ३० मिनीटे मॉर्निंग वॉक करते. तसेच तिच्या डेली रुटींग मध्ये सायकलिंग सुद्धा करते. सायकलिंग मुळे बॉडी मजबुत होते आणि ब्रेन पावर वाढते असे सनीचे म्हणणे आहे. बॉडी फॅट्स कमी करण्यासा्ठी ती रोज स्कैट्स एक्सरसाइज करते. त्यामुळे पोटातील मांसपेशी मजबुत होतात आणि बॉडीचा खालचा भाग शेपमध्ये राहतो. तसेच ती नियमित जीममध्ये सुद्धा वर्कआऊट करते.

सनी सकाळी लवकर उठते. उठल्यावर ती सर्व प्रथम नारळ पाणी किंवा लिंबु सरबत पिते. तर काही वेळेस ताज्या फळांचा रस सुद्धा ती पिते. संपुर्ण दिवसात ती कमीत कमी ८ ग्लास पाणी पिते. त्यामुळे स्किन हायड्रेट ठेवण्यास खुप मदत मिळते. सनीला कॉफी प्यायला खुप आवडते त्यामुळे ती नाश्त्याला कॉफीच पिते. या शिवाय नाश्त्याला ती ओटमील खाते. काही वेळेस ओव्हर इटींग होईल ती टाळण्यासाठी ओटमील्सचे छोटे छोटे पॅकेट स्वतासोबत ठेवते. लाइट ब्रेकफास्ट केल्यावर ती वर्कआऊट करते.

शरीराला फिट ठेवण्यासाठी ती नैसर्गिक आणि कच्चा गोष्टी खाण्यावर भर देते. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी ती ज्युस पिते. तसेच सोबत कमी तेलात फ्राय केलेल्या कच्चा भाज्या खाते. रात्रीच्या जेवणात सनी अधिकतर शाकाहारी आहार घेते. त्यात बीन्स, शिमला मिरची, टोमॅटो यांपासुन तयार केलेल्या भाज्यांचा समावेश असतो. फ्राइट फुड आरोग्यासाठी हानिकारक असतात त्यामुळे ती अशा पदार्थांपासुन दुर राहणे पसंत करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *