बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकेमकांचे अगदी पक्के दोस्त आहेत. एकमेकांवर अक्षरशः जीव ओवाळून टाकणारे असेच दोन मित्र म्हणजे, डॅशिंग जॅकी श्रॉफ आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान होय. सलमानचं तसं बॉलिवूडमध्ये बऱ्याच जणांशी वैर घेतलं आहे. पण ज्यांच्यावर त्याने जीव लावला ते त्याचे जिगरी यार देखील बॉलिवूडमध्ये तितकेच आहेत. जग्गू दादासोबत सलमानची यारी देखील अशीच आहे.

जग्गू दादा आणि सलमान एकमेकांना सलमानच्या करियरच्या सुरुवातीपासून ओळखतात, त्यावेळेस सलमान मॉडेलिंग करत होता व असिस्टंट डायरेक्टर म्हणून देखील काम करत होता आणि जग्गू दादा त्यावेळेस बॉलिवूडमधील सुपरस्टार होते. सलमानला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक हा जग्गू दादाकडून मिळाला होता.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ सलमानबद्दल अगदी भरभरून बोलले. जॅकी ने सांगितले की सलमान खान एक मॉडेल होता आणि त्यानंतर त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले तेव्हापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, १९८८ मध्ये जेव्हा मी फलक नावाचा चित्रपट करत होतो, तेव्हा त्या चित्रपटाच्या सेटवर सलमान खान माझे कपडे व बूट सांभाळत होता. लहान भाऊ जसे एखाद्या मोठ्या भावाची काळजी घेतो तशी तो तेव्हा माझी काळजी घेत असे.

सलमान खरंतर असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता पण मी त्याचे फोटो निर्मात्यांना दाखवत असे. आणि अखेर येत्या प्रयत्नांना यश येत बोकाडिया यांच्या ब्रदर इं लॉ या चित्रपटामध्ये सलमान ला बॉलीवूड मध्ये पहिला ब्रेक मिळाला. मैने प्यार किया या चित्रपटातून सलमानला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.

माझ्यामुळेच सलमानला इंडस्ट्री त्याचा पहिला ब्रेक मिळाला. आमची मैत्री मैत्रीण घनिष्ट आहे. कोणताही एखादा मोठा किंवा नवा प्रोजेक्ट आला की तो सर्वप्रथम माझ्या नावाचा विचार करतो. बंधन, वीर, सिर्फ तुम, सपने साजन के, काही प्यार ना हो जाये, भारत आणि नुकताच रिलीज झालेला राधे या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ आणि सलमान यांनी एकत्र काम केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *