सध्याच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत म्हणुन ओळखला जाणारा सुप्रसिद्ध गायक म्हणजे अरजीत सिंह. त्याच्या आवाज, आवाजातील एक भावना, सुर या सर्व गोष्टी तरुणाईला वेड लावतात. त्यामुळेच सध्या अनेकजण अरजीत सिंहची गाणी जास्त गुणगुणताना दिसतात. हे झालं अरजीत सिंहच्या प्रोफेशन लाइफ बद्दल. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक असेल.

अरजीत सिंहचे पहिले लग्न वर्षभर सुद्धा टिकले नाही. त्यानंतर त्याने त्याची बालमैत्रीण आणि एका मुलाची आई असलेली कोयल रॉयसोबत लग्न केले. मात्र त्याने त्याचे दुसरे लग्न सगळ्यांपासुन लपवुन ठेवले होते. अरजीतने सावरिया चित्रपटाच्या गाण्यांपासुन त्याच्या करीयरला सुरुवात केली होती. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती आशिकी 2 मधील गाण्यांमुळे. त्या चित्रपटामुळे तो रातोरात स्टार बनला. त्यानंतर अरजीतला रोमॅंटिक गाण्याचा किंग म्हणुन ओळखले जाऊ लागले. पण अरजीत स्वता सुद्धा कमी रोमॅंण्टीक नाही. कारण त्याने सुद्धा दोन लग्न केली.

अरजीतने प्लेबॅक सिंगर म्हणुन पहिला रियालिटी शोमध्ये काम केले होते. त्याचवेळी २०१३ मध्ये फेम गुरुकुल या रियालिटी शोच्या स्पर्धक रुपरेखा बॅनर्जीच्या प्रेमात पडला आणि दोघांनी लग्न केले. मात्र त्यांचे लग्न फारकाळ टिकले नाही. आणि वर्षाच्या आतच दोघेही वेगळे झाले.

त्यानंतर अरजीत सिंहने एक मुलाची आई असलेल्या आपल्या बालमैत्रीणीसोबत लग्न केले. रुपरेखासोबत वेगळे झाल्यावर अरजीतने २०१४ मध्ये कोयल रॉय सोबत लग्न केले. कोयलच्या सुद्धा पहिल्या लग्नाला फारसे यश आले नव्हते. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या पतीला घ*ट*स्फो*ट दिला. कोयलला त्यांच्या पहिल्या लग्नापासुन एक मुलगा सुद्धा होता.

अरजीतने कोयलशी लग्न केल्याची गोष्ट ही खुप काळ सगळ्यांपासुन लपवुन ठेवली होती. त्यानंतर काही दिवसांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती सगळ्यांना दिली. कोयल आणि त्याच्या संबंधाबद्दल त्याने एका मुलाखतीत सांगितले होते कि आम्हा दोघांना चित्रपटांची खुप आवड आहे. आम्हाला मिळुन एक पुस्तक लिहायचे होते. आम्ही लहान असताना एकत्रच शिकायचो. लग्नासाठी मी तिला सर्वात आधी विचारले होते.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडियामध्ये सा ही फिल्म अरजीतने दिग्दर्शित केली होती. या फिल्मची कथा कोयलने अरजीत सोबत मिळुन लिहिली होती. आता सुद्धा कोयल अरजीतला त्याच्या प्रोजेक्टमध्ये मदत करत असते. तिला पुस्तकांची खुप आवड आहे व सोबतच चित्रपटांच्या सुद्धा त्या शौकिन आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *