बॉलिवूडमधील सुंदर, अदाकारा अभिनेत्री म्हणजे जुही चावला. आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाने देखील तिने रसिक प्रेक्षकांना मोहित केले. १९८४ मध्ये जुहीने मिस इंडिया हा किताब जिंकला, त्यानंतर ४ वर्षांनी जुहीला बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. आमिर खानसोबत ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामधून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर एकामागून एक चित्रपटांची रांग लागली, ९० च्या दशकात तर प्रत्येक निर्माता जुहीसोबत कामं करू इच्छित होता.

लुटेरे, आयना, डर, हम है राही प्यार के या चित्रपटांसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेयर पुरस्कार मिळवला आहे. जुही ही शाहरुख खान सोबत इंडियन प्रीमियर लीग मधील ‘कोलकाता नाईट रायडर्स या संघाची सह मालकीण आहे.
बॉलीवूडमध्ये स्थिरावत असतानाच जुहीने १९९५ मध्ये उद्योगपती जय मेहता यांसोबत लग्न केले. जुहीपेक्षा जय मेहता हे पाच वर्षांनी मोठे असल्याने त्यांच्या लग्नाची बातमी कळताच त्यांना ट्रोल केले.

अनेकांचा तर त्यांच्या लग्नाच्या बातमीवर विश्वास बसत नव्हता. यामागील मूळ कारण म्हणजे यांच्या अफेयरबद्दल कधीही उघडपणे बोललं गेलं नव्हतं. यानंतर यांच्या लग्नाचा फोटो समोरं आला तेव्हा तर जय मेहता यांची फार खिल्ली उडवली. इतकेच नव्हे तर काहींनी जुहीच्या पतीला सरळ म्हातारा असे देखील संबोधले. यावरच न थांबता पैशांसाठी जुहीने जय मेहता यांच्याशी लग्न केले इतकंही लोक बोलू लागले. इतकं हिणवून देखील जुही कधीही त्यांच्या नात्याबद्दल बोलली नाही.

जय मेहता हे मेहता ग्रुपचे मालक असून ते खूप मोठे उद्योगपती आहेत. जुही चावला ही त्यांची दुसरी पत्नी आहे. सुजाता बिडला ही त्यांची पहिली पत्नी, १९९० मध्ये बंगलोरमध्ये विमानाच्या अपघातामध्ये मृत्यू पावली. या अपघातानंतर काही दिवसांनी जुहीच्या आईचा दे*हां*त झाला. या काळात जुही आणि जय मेहता एकटे पडले होते पण दोघे ही एकमेकांना आधार देत उभे राहिले. आपल्याला अडीअडचणीत आणि दुःखात आयुष्यभर साथ देतील अशी जुहीला खात्री होती. काही काळानंतर म्हणजे १९९५ साली या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि गु*प्त*पणे लग्न केले.

लग्नानंतर काही दिवसांनी जुहीची बहीण सोनिया हिचा कॅन्सरसोबत लढताना मृत्यू झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच तिचा भाऊ बॉबी याला स्ट्रोक आला आणि त्यानंतर बराच काळ ते आजारी देखील होते. बॉबी हे शाहरुख खानच्या चिली प्रोडक्शन हाऊसमध्ये सीईओ होते. काही काळानंतर जुहीच्या भावाचा देखील मृत्यू झाला.

यानंतर जुही आणि जय मेहता यांच्याशी आनंदाची चाहूल आणणारा काळ आला, ज्यावेळेस जुही पहिल्यांदा आई होणार होती. २००१ मध्ये जुहीने त्यांच्या मोठ्या मुलीला जान्हवीला जन्म दिला. नंतर २ वर्षांनी त्यांच्या कुटुंबामध्ये मुलाच्या रूपात अजून एका व्यक्तीची भर पडली. जुही सध्या बॉलीवूडमध्ये सक्रिय नसून ती कुटुंबासोबत आपला वेळ घालवत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *