बॉलिवुडला अनेक सौंदर्यवती अभिनेत्री लाभल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री श्रुती हसन. श्रुतीने बॉलिवुड सोबतच अनेक साऊथकडील चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्यामुळे मोठ्या पडद्यावर तिची स्वताची अशी वेगळी ओळख आहे. या व्यतिरिक्त श्रुती तिच्या बेधडक अंदाजासाठी सुद्धा खुप प्रसिद्ध आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुद्धा नेहमीच खुलेआम बोलत असते. श्रुती म्हणजे साऊथकडील सुपरस्टार कमल हसन आणि सारिका यांची कन्या.

श्रुती लाईमलाईटपासुन जरी दुर असली तरी चाहात्यांसाठी सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. काही दिवसांपुर्वीच झालेल्या एका इंटरव्ह्युमध्ये तिच्या पालकांच्या झालेल्या घ*ट*स्फो*टा*मुळे ती खुश असल्याचे तिने सांगितले. पालकांच्या घ*ट*स्फो*टाबद्दल असे का म्हणाली श्रुती या बद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

काही दिवसांपुर्वीच एका एंटरटेंमेंट वेबसाईडला श्रुतीने मुलाखत दिली होती. त्यात ती म्हणाली. माझ्या आई वडिलांनी वेळीच वेगळ होण्याचा निर्णय घेतला यासाठी मी खरचं खुष आहे. जर दोन व्यक्ती एकत्र एकमेकांसोबत राहु शकत नसतील तर त्यांना राहण्याची जबरदस्ती करणे फार चुकीचे आहे. श्रुतीने सांगितले की ती तिच्या वडिलांच्या जास्त जवळची आहे पण तिची आईसुद्धा तिच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मी खुश हे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. कारण ते दोघेही वेगवेगळ्या प्रवृत्तीची उत्तम माणसे आहेत.

श्रुती खुप लहान असतानाच तिचे आई वडिल वेगळे झाले. आणि ते एकत्र राहण्या ऐवजी वेगवेगळे राहुन खुप खुश होते. कमल हसन आणि त्यांची पत्नी लग्नानंतर १६ वर्षांनी वेगळे झाले. त्यांचे लग्न १९८८ मध्ये झाले होते तर घ*ट*स्फो*ट २००४ मध्ये झाला. त्यावेळी त्यांच्या दोन्ही मुली म्हणजे श्रुती १६ वर्षांची तर अक्षरा तिच्याहुन लहान होती. बॉलिवुडबद्दल बोलयचे झाल्यास श्रुतीने २००९ मध्ये लक चित्रपटामधुन पदार्पण केले होते. त्यानंतर तिने डी-डे, रमया – वस्तावय्या, गब्बर इज बॅक, वेलकम बॅक यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. श्रुती वकिल साब या चित्रपटात सर्वात शेवटी दिसली होती. आता ती लवकरच प्रभास सोबत सलार चित्रपटात दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *