स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका “रंग माझा वेगळा” मधील मुख्य नायकाची भूमिका पार पडणारा अभिनेता म्हणजे आशुतोष गोखले. या मालिकेत तो मुख्य नायक असून डॉक्टरचे पात्र तो सकारत आहे. एक आदर्श मुलगा, भाऊ, मित्र आणि नवरा अशी सर्वच विशेषणं अगदी तंतोतंत तो या भूमिकेतून पार पाडत आहे. प्रेक्षक वर्गाला देखील आशुतोषचा अभिनय फार आवडतो आहे.
झी मराठीवरील “तुला पाहते रे” मालिकेत सुबोध भावेच्या लहान भावाची म्हणजेच जयदीप सरंजामेची भूमिका साकारली होती ती आशुतोष गोखले यानं. विक्षिप्त, रागीट, स्वत:ची अक्कल न वापरणारा, लाडाकोडात वाढलेल्या जयदीपची भूमिका आशुतोषनं उत्तम साकारली. या मालिकेमुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली.
आशुतोष गोखले याचं संपूर्ण नाव आशुतोष विजय गोखले असं आहे. यावरून आपल्याला कळलं असेलच की आशुतोष हा सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. विजय गोखले यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय गोखले यांनी दिग्दर्शन देखील केले आहे. त्यामुळे र*क्ता*तच अभिनयाचे कौशल्य असल्याने कुमारवयातच आशुतोषने अभिनय करण्यास सुरुवात केली. महाविद्यालयामध्ये असल्यापासूनच आशुतोष विविध एकांकिकांमध्ये अभिनय करत असे. आशुतोषच्या बत्तीशी नामक एकांकिकेला स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालेल्या होते.
पुढे मराठी रंगभूमीवर येतं काही नाटकांमध्ये आशुतोषने काम केले. भाऊचा धक्का, डोन्ट वरी बी हॅप्पी, ओ वुमनिया यामध्ये अष्टपैलू अभिनेता भरत जाधव यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ‘दम असेल तर’ आणि ‘भरत आला परत’ या मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला. दम असेल तर या चित्रपटामध्ये आशुतोषने वडील विजय गोखलेंसोबत काम केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !