मोबाइलमुळे जग हातात आले आहे. सोशल मीडियाच्या मार्फत जगात कुठे काय चालले आहे हे आपण घरबसल्या पाहु शकतो. या माध्यमामुळे अनेकांचे आयुष्य बदलुन गेले आहे. युट्युब मार्फत लोक त्यांच्यातील रचनात्मक आणि सृजनशील कला लोकांसमोर मांडतात त्यामुळे युट्युब या लोकप्रिय माध्यमातुन लोकांनी बक्कळ पैसे कमावले आहेत. असातच सध्या युट्युबवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो सध्या सध्या तुफान चर्चेत आला आहे.
तसे पाहायला गेले तर हा व्हिडीओ केवळ ५५ सेकंदांचा आहे. पण सोशल मीडियावर मात्र या व्हिडीओचा चांगलाच बोलबोला आहे. कारण या व्हिडीओने घातलेल्या धुमाकुळीने त्यांच्या परिवाराचे संपुर्ण नशिबच पालटले आहे. या व्हिडीओने प्रेक्षकांच्या काळजात घर केले आहे. त्यात ५५ सेकंद दोन लहान निरागस मुलं दिसतात. त्या मुलांना प्रेक्षकांनी एवढे काही डोक्यावर घेतले आहे की त्या व्हिडीओची किंमत रोतारात वाढली आहे. या व्हिडीओचा नुकताच लिलाव करण्यात आला ज्यात त्याची तब्बल ५ करोड रुपये इतकी किंमत लागली.
वेबसाइट मेल ऑनलाइनच्या मते युएस येथील आईटी कंपनीत काम करणाऱ्या हॉवर्ड डेविस कैरने मे २००७ मध्ये हा ५५ सेकंदाचा व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओत दिसणाऱ्या मुलांची नावे हॅरी आणि चार्ली असे आहे. ज्यावेळी हा व्हिडीओ काढण्यात आला त्यावेळी या मुलांचे वय क्रमशा तीन आणि एक वर्ष होते. तुम्ही या व्हिडीओत पाहिलेत तर हॅरी आणि चार्ली एका खुर्चीत बसलेले दिसतील. त्यावेळी चार्ली हॅरीचे बोट चावतो.
हॉवर्ड सांगतात कि हा एक मजेशीर व्हिडीओ म्हणुन मी त्यावेळी तो अपलोड केला होता. चार्ली बिट माय फिंगर असे त्यांनी या व्हिडीओला नाव दिले. व्हिडीओ अपलोड केल्यावर तो काढुन टाकण्यासाठी जेव्हा त्यांनी युट्युब उघडले. तेव्हा तो व्हिडीओ हजारो वेळा पाहिले गेल्याचे हॉवर्डला समजले. त्यांनंतर त्यांच्या डोळ्यादेखत ती संख्या वाढत गेली, पण हा व्हिडीओ लोक इतका का पाहत आहे हे मात्र मला समजले नाही असे हॉवर्डने सांगितले.
लोकांनी मात्र त्या दोन भावडांचा व्हिडीओ पाहुन त्यांना इंटरनेटचा हिरो बनवले. पण त्या चिमुकल्यांना मात्र इंटरनेट या संकल्पनेची काहीच कल्पनासुद्धा नव्हती. हळुहळु या व्हिडीओ मार्फत हॉर्डला पैसे मिळु लागले, जाहिराती मिळु लागल्या. त्यानंतर हा व्हिडीओ पुन्हा एकदा लिलावात काढण्यात आला त्यावेळी त्याला ५.५ करोड रुपयांची बोली लागली.
आता पर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ ८८३ मिलियन वेळा पाहिला गेला आहे. २००७ मध्ये अपलोड केलेल्या या व्हिडीओमधील मुले सुद्धा आता मोठी झाली आहेत. हॅरी आता ६ फुट उंच झाला असुन तो प्राथमिक शिक्षण घेत आहे तर चार्ली आता १५ वर्षांचा झाला आहे. हॉवर्डने सांगितले कि खरेतर हा व्हिडीओ चार्ली आणि हॅरीच्या आजी आजोबांना पाठवण्यासाठी काढला होता. मात्र या व्हिडीओची साईज मोठी असल्यामुळे तो इमेलवर पाठवता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक युट्युब अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला.
आजी आजोबांसाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ आमचे नशिब पालटेल असा आम्ही कोणीच विचार केला नव्हता. मात्र काही गोष्टी या नियतीवर सुद्धा अवलंबुन असतात. जे या व्हिडीओ सोबत सुद्धा घडले. या व्हिडीओमुळे संपुर्ण कुटुंबाचे नशिब चमकले. आज जरी या व्हिडीओतली मुले मोठी झाली असली तरी त्यांची निरागसता आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !