भारतातील आपले सबस्काइबर वाढवण्यासाठी जोर लावत असलेल्या अमेरिकन दिग्गज कंपन्या प्राइम व्हिडीओ आणि नेटफिल्किस सध्या मेगा बजेट देशी कंटेटकडे वळले आहे. बुधवारी नेटफिल्क्सचे दिग्दर्शक राजोमौली यांचा बिग बजेट चित्रपट आरआरआर प्रदर्शित झाल्यावर तो हिंदी प्रदर्शित करण्याचा अधिकार खरेदी केला. यासाठी नेटफ्लिक्सने मोठी रक्कम दिली आहे. एस एस राजामौली यांचा आरआरआर हा चित्रपट तेलुगू आदिवासी नेते अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारम भीम यांच्यावर आधारित आहे. अल्लूरी सीताराम राजू यांची भुमिका राम चरण साकारणार आहे तर जुनियर एनटीआर कोमारम भीम यांची भुमिका साकारणार आहे.
दक्षिणेकडील या दिग्गज कलाकारांव्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण आणि आलिया भट्ट हे दोन बॉलिवुड कलाकार सुद्धा दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम जोरदार चालु असुन या वर्षीच्या दसऱ्यापर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाचे निर्माते जयंतीलाल गाडा यांनी डिजिटल आणि सॅटेलाइट प्रसरणाचे अधिकार तब्बल ३०० करोड रुपयांना खरेदी केले. चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर गाडा यांनी ओटीटीवरील प्रसरणाचे अधिकार दोन भागात वाटले आहे.
या चित्रपटाच्या हिंदी प्रसरणाचे अधिकार नेटफ्लिक्सने मोठी रक्कम देऊन खरेदी केले आहे. नेटफ्लिक्सकडे सध्या पोर्तुगिज, कोरीया, तुर्की आणि स्पेन भाषेत चित्रपट पाहण्याचे अधिकार आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तेलगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये सुद्धा जी५ वर दिसणार आहे.
डिलमध्ये सर्वप्रथम उडी घेतल्यामुळे सॅटेलाईट चॅनलवर झी वर हिंदीत सुद्धा हा चित्रपट दाखवला जाणार असल्यामुळे झी समुहाला याचा फायदा होणार आहे. या चित्रपटाचे तमिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम भाषेचे सॅटेलाईट अधिकार स्टार इंडियाला चॅनलला मिळाले आहे. चित्रपटाची शुटींग आणि देशातील निवडणुक अभियानाची गती पाहता हा चित्रपट जुलै ऑगस्ट पर्यंत चित्रपट गृहात प्रदर्शित होऊ शकतो.
१३ ऑक्टोबर २०२१ ला आरआरआर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जाते. देशात सध्या चालु असलेले कोरोनाचे यु*द्ध पाहता राजामौली यांनी यु*द्धपातळीवर काम करुन चित्रपटाची शुटींग पुर्ण करुन घेतली. योग्य वेळ पाहुन ते या चित्रपटातील कलाकारांचे लुक्स रिलीज करत असतात. हा चित्रपट या वर्षींचा सर्वात मोठा चित्रपट असल्यामुळे त्याला मोठी ओपनिंग मिळु शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !