हिंदी सिने सृष्टी म्हणजेच बॉलिवुडने शंभरी पार केली. मात्र प्रेक्षकांच्या मनावरुन बॉलिवुडची मोहिनी कमी झालेली नाही. बॉलिवुडची कमर्शिअल आणि नॉन कमर्शिल चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडतात. बॉलिवुड स्टार आणि त्यांची लाइफ स्टाइल ही आजे देखील प्रेक्षकांसाठी कुतुहलाचा विषय असतो. प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या कलाकारांची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या ग्लॅमर कडे आकर्षिले जातात. असे अनेक कलाकार आहेत ज्यांना दरवर्षी कोणते ना कोणते पुरस्कार मिळत असतात. पण इंडस्ट्रीमध्ये असे ही काही कलाकार आहेत ज्यांची नावे थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहेत. तर आज लेखा द्वारे आम्ही तुम्हाला याच कलाकारांना कोणत्या कारणांमुळे गिनिज बुक मध्ये नाव नोंदवले गेले.

1. अमिताभ बच्चन – या यादीत पहिले नाव येते ते बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे. अमिताभ हे बॉलिवुडमधील पहिले कलाकार आहेत ज्यांनी हनुमान चालीसा गायली. ती हनुमान चालीसा शेखर रावजियानी यांनी कंपोज केली होती. ते असे एकमेव अॅक्टर आहेत ज्यांनी बॉलिवुडच्या १३ सिंगर्ससोबत मिळुन हनुमान चालीसा गायली होती.

2. शाहरुख खान – बॉलिवुडचा रोमॅन्सचा बादशहा शाहरुख खानचे नाव सुद्धा या यादीत सहभागी आहे. २०१३ मधील कलाकारांच्या शर्यतीत त्याने सर्वात जास्त पैसे कमावले होते. शाहरुख खाने २०१३ मध्ये तब्बल २२० करोड रुपये कमावले होते. या यादीत केवळ अमिताभ बच्चनच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन सुद्धा आहे. अभिषेक बच्चन – अभिषेकने दिल्ली ६ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी १२ तासात १८०० किलोमीटरचा प्रवास केला होता. १२ तासांत वेगवेगळ्या शहरांतुन सार्वजनिक रित्या सर्वाधिक उपस्थिती नोंदवणाऱ्या कलाकारांमध्ये अभिषेकच्या नावाच्या नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.

3. कुमार सानु – बॉलिवुडचे पार्श्व गायक कुमार सानु सुद्धा या यादीत सहभागी आहेत. १९९३ मध्ये एकाच दिवशी २८ गाणी गायल्यामुळे त्यांचे नाव गिनिज बुक मध्ये नोंदवण्यात आले. तसे त्यांची सर्वच गाणी ब्लॉकबस्टर ठरली मात्र त्यांना खरी ओळख सुपरहिट चित्रपट आशिकीच्या गाण्यांमुळे मिळाली.

4. ललिता पवार – चित्रपटांमध्ये खलनायिकेचे पात्र रंगवुन प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री ललिता पवार या देखील या यादीत सहभागी आहेत. ललिता यांनी वयाच्या १२ व्या वर्षी बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. ७० वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये त्यांनी ७०० हुन अधिक चित्रपटांमध्ये सलग काम केले. ललिता पवार या बॉलिवुडच्या एकमेव अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवुडमध्ये सलग ७० वर्षे काम केले आहे.

5. कतरीना कैफ – या यादीत केवळ अभिनेतेच असे नाही. त्यात बॉलिवुडची काही हाय पेड अभिनेत्री कतरीना कैफसुद्धा आहे. २०१३मध्ये सर्वाधिक फि घेणारी अभिनेत्री म्हणुन कतरीनाच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. त्यावेळी कतरीनाने एका चित्रपटासाठी दहा मिलीयन डॉलरहुन अधिक फि घेतली होती.

6. जगदिश राज – चित्रपटांमध्ये पोलिसांची कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भुमिका असते. बॉलिवुडमध्ये सुद्धा असे बरेच कलाकार आहेत ज्यांना पोलिसांची भुमिका साकारुन ओळख मिळाली. त्यातीलच एक कलाकार म्हणजे जगदिश राज. त्यांनी १४४ चित्रपटांमध्ये पोलिस निरीक्षकाची भुमिका साकारल्या होत्या. त्यासाठी त्यांचे नाव गिनिज बुकमध्ये सुद्धा नोंदवण्यात आले.

7. २०१५ चा ब्लॉकबस्टर चित्रपट बाहुबलीची त्यावेळी संपुर्ण देशात बोलबाला होता. अनेक रेकॉर्ड तोडल्यानंतर या चित्रपटाने स्वताचाच एक रेकॉर्ड केला. या चित्रपटाचे यश पाहता फिल्मी जगताच्या इतिहासात बाहुबली चित्रपटाचे सर्वात मोठे पोस्टर तयार करण्यात आले. ते पोस्टर ५० हजार स्केअर फिटहुन सुद्धा जास्त मोठा होता. त्यामुळे या चित्रपटाची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *