अमिताभ बच्चन यांच्या पेक्षाही महागडे घर खरेदी केले अजय देवगण यांनी, नवीन घराची किंमत बघून थक्क व्हाल !

55

बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणून अजय देवगण व काजोल यांना मानलं जातं. दोघे ही बॉलिवूडमध्ये अत्यंत प्रसिद्ध कलाकार आहेत. आपल्या शुटिंच्या व्यस्ततेमधून वेळ काढत आपल्या कुटुंबाला वेळ देत असतात. हल्लीच आज देवगण आणि काजोल यांनी जुहू परिसरामध्ये नवीन बंगला खरेदी केला आहे. गेल्या काही काळामध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. जान्हवी कपूर आलीया भट, अमिताभ बच्चन, ह्रितिक रोशन, अर्जुन कपूर यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

यांच्यानंतर आता आज देवगण आणि काजोलने देखील तब्बल ६० कोटी इतकी रक्कम असलेला बंगला खरेदी केला आहे. अजयने घेतलेला हा बंगला ५ हजार ३१० चौरस फूट परिसरात पसरलेला बंगला आहे. या बंगल्याच्या मालकीण पुश्पय वालिया या होत्या. या बंगल्याची किंमत ६५-७० कोटी इतकी होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बंगला त्यांनी कमी किमतीत खरेदी केला. ही माहिती रियल इस्टेटशी संबंधित सूत्रांनी दिली आहे.

गेल्या वर्षभरापासून घराच्या शोधात असलेल्या या दोघांना त्यांचं नवं घर अखेरीस ते राहत असलेल्या भागातच मिळालं आहे. गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी या घराची डील फायनल केली. त्यानंतर ७ मी २०२१ मध्ये अजय देवगण आणि त्यांची आई विना वीरेंद देवगण यांच्या नावावर हा बंगला करण्यात आला. अजय देवगणने या नव्या प्रॉपर्टीचा ताब्यात घेत त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात केली आहे. अजय आणि काजोलच्या या नव्या बंगल्याशेजारी अक्षय कुमार, ह्रितिक रोशन, धर्मेंद्र व अमिताभ बच्चन अशा कलाकारांचे बंगले आहेत.

येत्या काही दिवसात अजय देवगणचे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. सूर्यवंशी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘मैदान’, ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’, ‘थँक गॉड’ आणि ‘मे डे’ अशा विविध चित्रपटांतून अजय देवगण आपले मनोरंजन करणार आहे. ‘मे डे’ या चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शक देखील खुद्द अजय देवगण आहे. कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बिग बींनी नुकताचं 31 कोटी रूपयांचं घर घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी मुंबईत 5184 स्केवअर फूटचं नवं घर खरेदी केलं आहे.  बिग बींनी तब्बल 62 लाख रुपये एवढे या जागेच्या स्टाम्प ड्युटीच्या रुपात भरले आहेत. या संपूर्ण आलिशान घराती किंमत ही एकूण 31 करोड रुपये आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !