सोनी टीव्हीवरील कार्यक्रम इंडियन आयडल संबंधित काही काळापासून वेगवगेळे खुलासे होत आहेत. इंडियन आयडलने आतापर्यंत ११ यशस्वी पर्व पार पाडली आहेत. पण या कार्यक्रमातील विजेत्यांची नाव देखील सध्या सर्व विसरले असतील. काळानुसार ही सर्व नाव मागे पडत गेली. मध्यंतरी पहिल्या पर्वाचा विजेता अभिजीत सावंत याने देखील इंडियन आयडल जिंकल्यानंतर बॉलिवूडमध्ये गाण्याची संधी मिळत नसल्याचा खुलासा केला.

संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून परीक्षण केले आहे. श्रेया घोषाल, आशा भोसले, अनु मलिक, सोनू निगम, जावेद अख्तर या व अशा अनेकांनी या कार्यक्रमाचे परीक्षण केले. यापैकी एक प्रसिद्ध गायिका म्हणजे सुनिधी चौहान. सुनिधी चौहान २०१०-१२ या दरम्यान या कार्यक्रमाची परीक्षक होती. अमित कुमार, अभिजित सावंत, सोनू निगम यानंतर आता सुनिधीने देखील हल्लीच तिच्या मुलाखतीमध्ये इंडियन आयडलबद्दल एक खुलासा केला आहे. या मुलाखतीदरम्यान तिने इंडियन आयडलचे परीक्षक पद का सोडले यामागील कारण सांगितले.

सुनिधीने मुलाखतीदरम्यान सांगितले कि, तिने इंडियन आयडल या कार्यक्रमाचे परीक्षक पद सोडण्याचे कारण हे त्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत. निर्मात्यांना जसं अपेक्षित होतं अगदी तसंच वागणं तिला मान्य नव्हतं. आपली विचारसरणी बाजूला ठेवून, त्यांना स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले गेले होते. मुलाखतीदरम्यान तिला विचारले गेले की, हा शो इतका का खेचला जात आहे; त्यावर तिने उत्तर दिले की हे सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सुरु आहे. यामध्ये स्पर्धकांचा बिलकुल दोष नाही. जेव्हा स्पर्धक फक्त आपली स्तुती ऐकतात, तेव्हा ते द्विधा मनस्थितीत अडकतात आणि त्यामुळे खरं टॅलेंट हे हरवून जातं.

पुढे सुनिधी म्हणाली, ज्यांना संगीत क्षेत्रात नाव कमवायचे आहे त्यांच्यासाठी यांच्यामुळे एक मोठं व्यासपीठ मिळाले आहे. परंतु या वागण्यामुळे कलाकाराचे नुकसान होते, कारण लोक टीव्हीवर आपली जीवनव्यथा सांगून एका रात्रीत प्रसिद्ध होतात आणि आपण काहीतरी करून दाखवू शकतो ही जिद्द संपून जाते.

पुढे बोलता बोलता सुनिधी असं देखील म्हणाल्या की, हो पण काही जण मेहनत सुद्धा करतात. पण अचानक क्षणात मिळणारी प्रसिद्धी त्यांच्या विचारशक्तीवर प्रभाव टाकत असते. यामध्ये स्पर्धकांची काही चूक नसते, कारण हा सगळं टीआरपीवर चालणारा खेळ आहे. सुनिधी असं ही म्हणाली की, शोमध्ये काही स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला ठीकठाक देखील केले जाते., याचा अर्थ विचारल्यानंतर सुनिधीने सांगितले की, गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेस गायकांना कधी मधेच समस्या निर्माणच्या होतात, या समस्या शोच्या टेलिकास्ट करण्यापूर्वी दुरुस्त केल्या जातात.

पुढे सुनिधी ने आपले मत मांडत सांगितले की, इंडियन आयडल, दिल है हिंदुस्थानी आणि द व्हॉइस यासारख्या कार्यक्रमांनाचे मी परीक्षण केलं आहे. मी आज ही तेच बोलेन जे मला वाटतं. हे शोच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे मी त्यांना शो चा भाग होणं अपेक्षित आहे कि नाही.

ज्यावेळेस किशोर कुमार यांचे पुत्र अमित कुमार यांना पैसे देऊन एका स्पर्धकाची स्तुती करण्यास सांगितले होते, त्यावेळेस इंडियन आयडलच्या १२ व्य पर्वाचा हा विवाद सुरु झाला. या विवादाचे उत्तर म्हणून आदित्य नारायण याने टोमणा देखील मारला होता आणि याशिवाय या कार्यक्रमाच्या स्पर्धकांना ट्रोल देखील केले गेले. टीव्हीवरील रिऍलिटी शोमध्ये जर अशाच गोष्टी घडत राहिल्या तर भविष्यात लोकांचे हे कार्यक्रम बघणे कमी होऊ शकते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *