आम्ही आर्टिकल लिहीत आहे परंतु आपले विचार वेगळे असू शकतात ते आपण कमेंट मध्ये नक्की मांडू शकता ! सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असला तरी लग्नाच्या हंगामात बदल झालेला नाही. त्यामुळे मुलींना सासरी कसे वावरायचे याचे शिक्षण अनेक घरात देताना पाहिले जाते. मुलीचे लग्न झाल्यावर तिचे घर, आडनाव, नाती गोती सर्व काही बदलुन जाते. मुलगी ते सुन असा तिचा प्रवास त्याक्षणी चालु होतो. त्यामुळे तिच्या अनेक सवयी सुद्धा बदलतात. लग्ना आधी बेफिकीर असलेल्या मुली लग्नानंतर मात्र जबाबदारीने वागु लागतात. त्यांच्यातील हे अमुलाग्र बदल पाहुन त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रीण अनेकदा अचाट होतात. तर मंडळी आज आम्ही तुम्हाला लग्नानंतर मुलींमध्ये काय बदल होतात ते सांगणार आहोत.

१. मुली जबाबदार होतात – लग्नापुर्वी आपल्याच राज्यात बेफिकीर वावरणाऱ्या मुली लग्नानंतर मात्र कमालीच्या जबाबदार होतात. विशेष म्हणजे लग्नानंतर त्यांना स्वत:ला त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते. त्या त्यांच्या कुंटुबाकडे लक्ष देतात. परिवारातील हिसाब किताबाडे लक्ष देतात. कोणाला काय हवे नको याकडे जातीने लक्ष देतात. एखाद्या जबाबदार स्त्री मध्ये त्यांचे रुपांतर होते.

२. करियर – लग्नानंतर एक प्रकारची जबाबदारी अंगावर येऊन पडते. लग्नापुर्वी प्रत्येक मुलीचे लक्ष हे त्यांच्या करियरवर असते. पैसे कमावणे, भविष्यासाठी पैशांची जुळवाजुळव करणे, करियरमध्ये अजुन पुढे कसे जाता येईल या सर्वाकडे मुलींचा अधिक कल असतो. मात्र लग्नानंतर चे बदलते. करियर ऐवजी कुटुंब ही त्यांची प्राथमिक जबाबदारी बनते. घराची जबाबदारी, मुलांना सांभाळणे या सर्व रगाड्यापाठी त्यांचे करियर कुठेतरी प्राथमिकते वरुन दुसऱ्या स्थानी जाऊन पोहचते.

३. पैसे वाचवण्याची कला – लग्नापुर्वी ज्या मुली पैसे खर्च करताना कशाचाही मागे पुढे विचार करायच्या नाहीत त्या आता लग्नानंतर मात्र पैशांची काटकसर करण्यास बरोबर शिकतात. पैशांची काटकसर करुन कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या सर्व गोष्टींकडे त्या नेटाने लक्ष देतात.

४. बाहेर फिरणे कमी होते – लग्नापुर्वी ज्या मुलीला तिच्या मित्रमैत्रीणींसोबत फिरायला, पार्टी करायला आवडते त्यांचे लग्नानंतर आयुष्य बदलुन जाते. लग्नानंतर एखादा दिवस सुट्टी मिळालीच तर तो दिवस परिवारासोबत कसा घालवता येईल याकडे त्या जास्त लक्ष देतात.

५. आपल्या प्रत्येक निर्णयात कुटुंबाला प्राधन्य देणे – लग्नानंतर प्रत्येक मुलगी ही अधिक जबाबदार आणि कुटुंबासाठी जास्त सजग होते. लग्नापुर्वी स्वताचे निर्णय स्वताच घेणाऱ्या मुली लग्नानंतर मात्र कोणताही निर्णय घेताना आपला पती व कुटुंबाला विचारतात. किंवा कोणताही निर्णय घेण्यापुर्वी त्या निर्णयाचे त्यांच्या कुटुंबावर होणारे परिणाम तपासतात आणि मगच सर्व निर्णय घेतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *