कोरोनाच्या या भयावह संकटानंतर आता हळू हळू सगळं सुरळीत होत आहे. या कोरोना काळात अनेक कलाकारांचे जुने, फोटो, व्हिडीओ, काही घडलेले किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापासून बच्चन कुटुंब देखील बचावले नाही आहे. बरेच व्हिडीओ हे जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन बद्दलचे शेयर होताना दिसतात. लोक कमेंट देखील करतात आणि काही व्हिडीओ तर अनेकदा लोकांकडून उचलून धरले जातात. असाच एक अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात बिग बी नंतर वैतागले होते.

ऐश्वर्या बच्चन आणि अमिताभ बच्चन ही दोन्ही हिंदी चित्रपट सृष्टीत गाजलेली नावे आहेत. आपल्या कारकिर्दीत १८० हून अधिक चित्रपट अमिताभ बच्चन यांनी केले आहेत. अनेक विविध चित्रपटांसाठी त्यांनी फिल्मफेयर तसेच राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

अभिनयासोबतच ते निर्माता, पार्श्वगायक आणि हल्ली अनेक मोठ्या ब्रॅण्डसाठी ते ब्रँड अँबेसिडर आहेत. अमिताभ बच्चन यांचा चित्रपटातील एक डायलॉगवर ते पूर्ण चित्रपट उचलून धरायचे. फेमिना मिस इंडिया आणि फेमिना मिस वर्ल्ड ठरलेली सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन हिने हिंदी व्यतिरिक्त अनेक विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले. प्रसार माध्यमांनुसार तिची गणना जगातील सर्वात सुंदर स्त्रियांमध्ये केली जाते.

तर सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ २०१६ मधील अवॉर्ड शो चा आहे. या अवॉर्ड शो ला अमितभ बच्चन सून ऐश्वर्या सोबत गेले होते. अवॉर्ड शो नंतर अमिताभ बच्चन हे पत्रकारांसोबत बोलत होते, तेव्हा ऐश्वर्याचे अतिवागणे पाहून हैराण झाले होते. अमिताभ बच्चन पत्रकारांशी बोलताना ऐश्वर्या मध्येच हसत होती, मस्करी करत होती तर कधी अमिताभ बच्चन यांना मिठी मारत होती. हे वागणे पाहून बिग बी फार हैराण झाले. त्यावेळी ऐश्वर्याला रागात बच्चन यांनी सुनावले की, आराध्या सारखे वागू नकोस !

मॉडेलिंग व्यतिरिक्त ऐश्वर्या इतर क्षेत्रात ही यशस्वी झाली आहे. १९९१ मध्ये फोर्डद्वारा आयोजित सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकत ऐश्वर्याने वोग या प्रसिद्ध अमेरिकन मासिकामध्ये आपली जागा बनवली. १९९३ मध्ये अमीर खांसोबतच्या एका जाहिरातीमध्ये ऐश्वर्या दिसली होती. टॉलिवूड मधील १९९७ साली प्रसिद्ध झालेल्या इरुवर या चित्रपटातून ऐश्वर्याने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

१९९९ साली प्रदर्शित झालेला राहुल रवैल दिग्दर्शित ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. ‘गुरु’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिषेक बच्चनने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले होते. २००७ मध्ये अभिषेक बच्चन सोबत तिचा विवाह झाला असून आराध्या नावाची गोड मुलगी त्यांना आहे.

चेहरा, झुंड, हेरा फेरी ३, पोन्नियिन सेल्वन, ब्र*ह्मा*स्त्र हे अमिताभ बच्चन यांचे काही आगामी चित्रपट आहेत. सध्या ऐश्वर्याकडे कोणत्याही बॉलिवूड असाईनमेन्ट नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *