बॉलिवुडमध्ये अनेक तारेतारका आहेत. त्यांचे कधी कोणाशी सुत जुळेल सांगता येत नाही. आता अभिनेत्री यामी गौतमीचेच पहा ना. तिने अचानक भयानक स्वताचे लग्न उरकुन घेतले आहे. काही वेळापुर्वीच यामीने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. यामीने आदित्य धरसोबत केले. आदित्य धर म्हणजे यामीचा चित्रपट उरीचे दिग्दर्शक या चित्रपटात यामी सोबत अभिनेता विकी कौशल मुख्य भुमिकेत दिसला होता.

सध्याच्या या कोरोनाच्या काळात अनेक सेलिब्रिटींनी त्यांची लग्ने उरकुन घेतली. आता त्याच यादीत अभिनेत्री यामी गौतमीचे नाव सुद्धा सहभागी झाले आहे. यापुर्वी जानेवारी महिन्यात अभिनेता वरुण धवनने त्याची बालपणीपासुनची मैत्रीण नताशा दलाल सोबत लग्न केले होते. त्याच्यानंतर आता यामीने नंबर लावला.

सोशल मीडियावर वेगात व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये यामी फारच सुंदर दिसत आहे. तिने अचानक तिच्या लग्नाची बातमी दिल्यामुळे यामीच्या चाहत्यांकडुन शुभेच्छांचा पूर आला आहे. यामीने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये पर्शियन कवी रुमी यांनी लिहिलेल्या काही ओळी पोस्ट केल्या आहेत- ”तुम्हारी रौशनी में, मुझे प्यार करना सिखाया”. तर पुढे तिने त्यांच्या समस्त परिवाराच्या साक्षीने लग्न केल्याचे सांगितले आहे. तो खुप छोटा सोहळा होता. यामीच्या लग्नात तिच्या काही जवळील माणसांनाच आमंत्रण होते.

यामी गौतमी चे पती आदित्य धर हे उत्तम दिग्दर्शक आहेतच मात्र याशिवाय एक लेखक आणि गीतकार सुद्धा आहे. त्यांनी काबुल एक्सप्रेस, हाय-ए-दिल , वन टू थ्री, आणि डॅडी कूल यासारख्या चित्रपटांना गाणी दिली आहे. तर आक्रोश आणि तेज या दोन चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लेखनाचे सुद्धा काम केले होते. २०१६ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारित उरी द सर्जिकल स्ट्राइक या चित्रपटा मार्फत त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam (@yamigautam)


या चित्रपटासाठी त्यांना ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. उरी नंतर आदित्य ‘अमर अश्वत्थामा हा चित्रपट दिग्दर्शित करणार असून त्यामध्ये सुद्धा अभिनेता विकी कौशल दिसणार आहे. तर नायिका म्हणून अभिनेत्री सारा अली खान असल्याचे बोलले जाते.

यामी आणि आदित्य एकमेकांना उरी चित्रपटापासुन ओळखतात. आदित्य हे एक उत्तम दिग्दर्शक आहेत. यामीच्या लग्नाचे फोटो सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे वरुण धवनने यामीने फोटो पोस्ट केल्यावर सर्वप्रथम लाइक केले होते.

यामी आणि आदित्य यांना भावी आयुष्यासाठी शुभेछया. आपणही आपल्या शुभेच्छा कमेंट्स मध्ये लिहू शकता ! मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *