शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी शरीरात योग्य मात्रेत कोलेस्ट्रॉल असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल आपल्या आयुष्यात महत्वाची भुमिका बजावत असतो. विटामिन डी, पाचक रस, ए*स्ट्रो*जे*न, प्रो*जे*स्टे*रॉ*न, टे*स्टो*स्टे*रॉ*न यांसारखे हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. कोलेस्ट्रॉलमुळे विटामिन ए, डी, ई आणि के यांना शरीरात शोषले जातात. र*क्तातील प्रोटीन आणि लिपिडपासुन तयार झालेल्या द्रव पदार्थात कोलेस्ट्रॉल असते. त्या द्रवाला लिपोप्रोटीन असे म्हणतात.
शरीरातील महत्वाच्या भागात कोलेस्ट्रॉल पोहचवण्याचे काम लिपोप्रोटीन करते. मानवी शरीरात हाई डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजेच चांगले कोलेस्ट्रॉल आणि लो डेंसिटी लिपोप्रोटीन म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल अशा दोन प्रकारचे कोलेस्ट्रोल असते. तर आज या लेखातुन आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्यास कोणकोणत्या समस्या उद्भवु शकतात या बद्दल माहिती सांगणार आहोत.
१. हात दुखी – जर विनाकारण तुमचा हात दुखत असेल तर वेळीच लक्ष द्या. कारण हे शरीरातील कोलेस्ट्ऱॉल वाढण्याचे संकेत आहेत. याव्यतिरिक्त पाय दुखत असतील तर ते देखील हाय कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. त्यामुळे यांसारख्या लक्षणांकडे चुकुनही दुर्लक्ष करु नका आणि वेळीच डॉक्टरांकडुन उपचार करा.
२.त्वचेवर निशाण – जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांखालील त्वचा नारंगी किंवा पिवळ्या रंगाची झालेली जाणवत असेल तर हे कोलेस्ट्रॉलचे संकेत आहेत. त्यामुळे हे संकेत हलक्यात घेण्याची चुक करु नका. त्यासाठी तुम्ही लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.
३. खुप घाम येणे – उन्हाळ्यात खुप घाम येणे हे नॉर्मल गोष्ट आहे. पण समजा तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त घाम येत असेल तर सावधान. कारण हे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे आहेत. तुम्हाला पण जर ही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांकडे जा.
४. धाप लागणे – शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढला तर श्वास फुलतो किंवा धाप लागते. तुम्ही थोडे जरी चाललात किंवा एखादे काम केल्यावर जर तुम्हाला खुप थकवा जाणवला तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. ते तुमच्या शरीराला घातक ठरु शकते.
कोलेस्ट्रॉल वाढण्याचे नुकसान – जर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढला तर ह्रदय रोग होण्याचा धोका वाढतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे छातीत दुखते, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच या सर्व गोष्टींकडे लक्ष द्या. नाहीतर तुम्हाला खुप नुकसान होऊ शकते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
अस्वीकरण – दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वरील माहिती इंटरनेट वरील माहितीचा आधार घेत बनवलेली आहे. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.