बॉलिवुडची मुन्नी आणि फिटनेस क्विन मलायका अरोरा सोशल मिडियावर खुप अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे चाहते तिला तिथे सुद्धा फॉलो करतात. मलायका अनेकदा तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर टाकत असते. तिचे फोटो पाहुन अनेकजण तिच्यावर घायाळ होत आहेत. शिवाय तिच्या फोटोला कमेंटसुद्धा करत आहेत. मलायकाची स्टाइल आणि अदा ही प्रत्येकाला घायाळ करणारीच असते. तिच्याकडे पाहुन तिला १८ वर्षांचा मुलगा आहे असा कोणीच अंदाज लावु शकत नाही. पण आता मलायकाने तिची एक विचित्र इच्छा बोलुन दाखवली आहे. मलायकाला एक मुलगी हवी आहे…..

सध्या टिव्हीवर सुपर डांसर चॅप्टर ४ हा शो गाजत आहे. त्यातील निरागस मुलं परीक्षकांसोबतच प्रेक्षकांचीसुद्धा मने जिंकुन घेण्यात यशस्वी ठरली आहेत. खरेतर शिल्पा शेट्टी या शोमध्ये परीक्षक म्हणुन काम करते मात्र काही कारणास्तव तिच्या अनुपस्थितीत मलायका परीक्षक म्हणुन या आठवड्यात पाहता येईल. या आठवड्यात अनेक स्पर्धकांचे तडाकेबाज परफॉर्मन्स पाहता येणार आहे. त्यातीलच एक छोटीशी ६ वर्षांची स्पर्धक आहे. तिचा डान्स पाहुन तिचे कौतुक करताना मलायका जरा देखील थकली नसल्याचे दिसुन येईल.

या शोमध्ये मलायकाने त्या स्पर्धकाला कडेवर उचलुन घेऊन मला नेहमीच एक मुलगी हवी होती असे म्हणाली. मलायका आणि फ्लोरिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान गाजत आहे. हा व्हिडीओ सोनी एंटरटेंमेंट चॅनलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अंकाउंटवरुन शेअर केले आहे.

या व्हिडीओमध्ये मलायका त्या स्पर्धकाला मी तुला घरी घेऊन जाऊ का असे विचारते. माझ्या घरी माझा मुलगा आहे. खुप वर्षांपुर्वी मी म्हणायचे काश मला एक मुलगी असती. माझ्याकडे खुप सुंदर चपला आहेत, कपडे आहेत. पण त्यांना घालणारी कोणी नाही. त्यानंतर मलायका फ्लोरिनला मिठी मारते. मलाईकाचं हे बोलणं ऐकून गीता माँ च्या डोळ्यात पाणी आले.

एका फुड शोमध्ये मलायकाने तिच्या मुलाबद्दल सांगितले होते कि, अरहान एक दिवस घरी आला आणि मला म्हणाला मम्मी सगळ्या मुलांचे पालक किती छान जेवण बनवतात पण तुला जेवणच बनवता येत नाही. त्याचे हे बोलणे मी एक चॅलेंज म्हणुन घेतले आणि मी माझ्या मुलासाठी चांगले जेवण बनवायला शिकेन असे मनोमनी ठरवले. आता मी कधी कधी स्वताच्या हाताने बनवलेले जेवण त्याला खाऊ घालत असते.

मलायका सध्या ४७ वर्षांची असुन ती खुप हॉट आणि फिट आहे. तिचे वय तिच्या ग्लॅमरच्या आड कधीच येत नाही. सध्या मलायका तिच्याहुन १२ वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपुरला डेट करत आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *