माणूस प्रेमात पडला की सारे जग त्याला गुलाबी दिसू लागते असे म्हटले जाते. आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो आहोत त्या व्यक्ती सोबत संपूर्ण आयुष्य घालवण्याची स्वप्ने माणूस पाहू लागतो. त्या स्वप्नांमध्ये एखादी व्यक्ती अशी काही मग्न होऊन जाते की त्या व्यक्तीस लग्न करण्यास धीर राहत नाही. आपल्या देशात लग्नासाठी मुलीचे वय १८ आणि मुलाचे २१ योग्य असा कायदा सांगतो. मात्र या वयात येण्याआधीच काहीजण प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्यामुळे वयात येताच ते पटकन लग्न करून टाकतात. हे फक्त सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीतच होते असे काही नाही. बॉलीवूड मध्ये देखील अशा काही जोड्या आहेत ज्या वयात यायच्या आधीच प्रेमात पडल्या होत्या. आणि वयात आल्यावर लगेच त्यानी लग्न उरकून घेतले.

1. या यादीत पहिले नाव येथील ते म्हणजे बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अमिर खान चे! अमीर चे पहिले लग्न रीना दत्ता सोबत किशोरवयात झाले होते. रीना १९ वर्षांची व अमिर २१ वर्षांचा असताना त्या दोघांनी लग्न केले. या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही मात्र त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव इरा खान असे आहे. अमिर आणि रिना वेगळे झाल्यावर ही त्यांच्या मुलीची देखभाल एखाद्या विवाहित दांपत्य प्रमाणेच करतात. रिनासोबत घ*ट*स्फो*ट झाल्यानंतर आमिर खानने २००५ मध्ये किरण राव सोबत लग्न केले.
2. या यादीतील दुसरे नाव म्हणजे शर्मन जोशी. शर्मन जोशीला आपण थ्री इ डी य ट्स, गो ल मा ल या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. शर्मन जोशीने एकेकाळच्या सुपरस्टार प्रेम चोपडा यांची मुलगी प्रेरणा चोपडा सोबत वयाच्या २१ व्या वर्षीच लग्न केले. आता या दोघांचा संसार वेलीवर ३ मुले आहेत व दोघेही सुखाने संसार करत आहे.
3. या यादीतील तिसरे नाव म्हणजे बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान. सैफ अली खान एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंहच्या प्रेमात पडला. त्यावेळी अमृता सैफ पेक्षा बारा वर्षांनी मोठी होती. त्याकाळी दोघांचे एकमेकांवर इतके प्रेम होते की सर्वांचा विरोध पत्करून १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांना लग्नानंतर सारा व इब्राहिम ही दोन मुले झाली. या दोघांचे लग्न झाले तेव्हा सैफ २१ वर्षांचा होता तर अमृता ३३ वर्षांची होती. काही काळानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर सैफ अली खान ने करीना कपूर सोबत लग्न केले त्यांना तैमूर मुलगा झाला. विशेष म्हणजे अभिनेता सैफ अली खान आता चौथ्यांदा बाबा होणार आहे.
4. अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी जेव्हा एकेकाळचे सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केलं त्यावेळी त्या केवळ १७ वर्षांच्या होत्या. डिंपल यांनी त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर बॉलीवूड मधून ब्रेक घेतला. डिंपल व राजेश खन्ना यांच्या ट्विंकल खन्ना व रिंकी खन्ना या दोन मुली आहेत. ट्विंकल खन्नाने आताचा बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सोबत लग्न केले.
5. एकेकाळचे प्रसिद्ध अदाकारा दिव्या भारती हिने १८ वर्षांची असताना निर्माता दिग्दर्शक साजिद नाडियावाला सोबत लग्न केले. तिचे लग्न फारच कमी वयात झाले मात्र तिच्या लग्न पेक्षा हि जास्त तिच्या र*ह*स्य*मय मृत्यूमुळे ती चर्चेत आली. अभिनेत्री दिव्या भारती ने इमारतीवरून उडी मारून आ*त्म*ह*त्या केली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *