बालपणी च्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतात. लहानपणीचे खेळ मजामस्ती, गप्पागोष्टी या सर्व मोठं झाल्यावर आठवताना एक वेगळीच मजा वाटते. या सर्व गोष्टींप्रमाणेच अजुन एक लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे बालपणी टीव्हीवर पाहिले जाणारे कार्यक्रम किंवा कार्टुन्स…. ९० च्या दशकातील मुलांना मनोरंजनाचा खजिनाच मिळाला होता.

या खजिन्यातील काही मालिका म्हणजे शक्तिमान, हातिम, हीरो , शकालका बुमबुम , विक्रम बेताळ आणि सोनपरी……
२३ नोव्हेंबर २००० ते १ ऑक्टोबर २००४ मध्ये स्टार प्लसवर प्रसारित होणारी मालिका सोनपरी हिने एक काळ खुप गाजवला होता. या मालिकेतील पात्र लहान मुलांना आपलेसे वाटायचे. आपल्य़ाकडे ही एक सोनपरी असावी अशी त्या काळी प्रत्येक लहान मुलाची इच्छा होती.

या मालिकेची लोकप्रियता पाहता त्या काळी बऱ्याच भाषांमध्ये ही मालिका चालु करण्यात आलेली. या मालिकेत सोनपरी छोट्या फ्रुटीची मदत करायला नेहमीच हजर असायची. मालिकेत दिसणारी छोटी फ्रुटी आता खुप मोठी झाली आहे. फ्रुटीचे खरे नाव तन्वी हेगडे. तन्वी आता पहिल्याहुन खुप बदलली आहे. पहिल्या नजरेत तिला सहज ओळखणे शक्य नाही.

तन्वीने ३ वर्षाची असल्यापासुन तिच्या करियरला सुरुवात केली होती. तन्वीने रसना बेबी कॉन्टेस्ट जिंकला होता. सोनपरी व्यतिरिक्त तन्वी शाकालका बुमबुमच्या काही एपिसोडमध्ये सुद्धा दिसली होती. 11 नोव्हेंबर १९९१ मध्ये मुंबईत तन्वीचा जन्म झाला. त्यानंतर मुंबईतच तिचे शिक्षण झाले. २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या गज गामिनी या चित्रपटात तन्वी पहिल्यांदा दिसली होती.

तन्वीने आता पर्यंत १५० हुन अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. तन्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे फोटो पोस्ट करत असते. सध्या ती मराठी चित्रपटांमध्ये जास्त अॅक्टिव्ह असते. सोनपरी मालिकेत तन्वी खुप क्युट दिसायची. मोठी झाल्यावरही ती खुप सुंदर दिसते. तन्वीने गजगामिनी व्यतिरिक्त ‘चैंपियन’, ‘विरुद्ध’ आणि ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले होते. सर्वात शेवटी तन्वी २०१६ मध्ये आलेल्या अथांग या मराठी चित्रपटात दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *