बॉलिवुडमध्ये अनेक किस्से रोज घडत असतात. त्यातील काही किस्से एखाद्या काळात खुप गाजतात. तर काही किस्से ज्यांच्या संदर्भात असतात त्याच्या वाढदिवशी किंवा त्यांचा मृत्यु झाल्यावर चर्चिले जातात. आज आम्ही तुम्हाला बॉलिवुडमधला अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगणार आहोत. काही दिवसांपुर्वीच स्मिता पाटील यांची बर्थ अॅनिवर्सरी साजरी करण्यात आली. त्यामुळे त्यांचा हा किस्सा समोर आला आहे.

अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांची जोडी ‘नमक हलाल’ या चित्रपटात सर्वांना पहायला मिळाली होती. असे म्हटले जाते कि या चित्रपटातील एका गाण्याची चित्रीकरणादरम्यान स्मिता पाटील अचानक खुप रडायला लागल्या होत्या. त्यावेळी बिगबींनी त्यांना सावरले होते. ते गाणे म्हणजे नमक हलाल चित्रपटातील प्रसिद्ध गीत आज रपट जाए तो हमे ना उठाइयो. हे गाणे ऐकल्यावर आजदेखील लोक ठेका धरायला लागतात. मात्र प्रत्यक्षात मात्र या गाण्याचे शुटींग करणे खुप कठीण ठरले होते.

या गाण्याचे शुटींग केल्यावर स्मिता पाटील घरी जाऊन खुप रडल्या होत्या. अमिताभ बच्चन यांना जेव्हा जाणावले कि स्मिता पाटील खुप उदास आहेत त्यावेळी त्यांनी या पाठील कारण जाणुन घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना समजले कि त्या गाण्यात चित्रित करण्यात आलेल्या बोल्ड सीन्समुळे स्मिताजींना थोडे अनकम्फर्टेबल वाटत होते. त्यावेळी त्यांनी स्मिता पाटील यांना समजावले कि ही केवळ चित्रपटाची डीमांड असल्यामुळे त्यांना तसे गाणे करावे लागले.

त्यानंतर स्मिताजींना अमिताभ यांचे म्हणणे पटले आणि त्यांनी पुढील चित्रीकरण करण्यास परवानगी केली. अमिताभ यांच्या बोलण्यामुळे त्यांच्यासोबत काहीच वाईट झाले नसल्याची त्यांना खात्री पटली. आणि त्यांनी पुढील चित्रीकरणाला परवानगी दिली. यानंतर अमिताभ आणि स्मिता यांची बॉंण्डीग खुप घट्ट झाल्याचे म्हटले जाते.

ती एवढी घट्ट झाली होती कि कुली चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेची चाहुल स्मिताजींना आधीच लागली होती त्यांनी याबाबत अमिताभ यांना एक दिवस आधीच पुर्वकल्पनासुद्धा दिली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *