बॉलिवुडचे सेलिब्रिटी असो वा त्यांची मुलं कोणत्याना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतातच. सध्या असेच काहीचे बॉलिवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप यांच्या बाबतीत झाली आहे. आलियासुद्धा तिच्या वडिलांप्रमाणेच खुप चर्चेत असते. आलिया तिचे ग्लॅमरस फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपुर्वीच आलियाने फादर्स डे निमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती तिच्या वडिलांना अतरंगी प्रश्न विचारताना दिसली.

आलियाने हा व्हि़डीओ तिच्या युट्युब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तुम्ही पाहु शकता कि अनुराग त्याच्य़ा मुलीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अगदी बिंधास्तपणे देत आहे. ते प्रश्न पण साधेसुधे नव्हते बरे का … एरव्ही जे विषय आई-वडिल त्यांच्या मुलांसमोर टाळतात तेच त्याच विषया वरील प्रश्न अनुराग ला त्याच्या लेकीने विचारले होते. आलियाच्या बॉयफ्रेंडचे नाव  Shane Gregoire आहे. अनुराग म्हणतो की मला शेन आवडतो. मला तुझ्या मैत्री ची निवड खुप आवडते. शेन खुप चांगला मुलगा आहे. शेन खुप अध्यात्मिक आणि शांत मुलगा आहे. काही वेळेस तर मोठ्यांना सुद्धा जमणार नाही अशा गोष्टी सुद्धा तो करुन दाखवतो. आलियाने तिच्या वडिलांना असे काही प्रश्न विचारले ज्यावर डॅडी कुल अनुरागने सुद्धा भन्नाट उत्तर दिली आहेत.

आलियाने या सेशनचे नाव Asking Your Dad Awkward Question असे ठेवले होते. तसेच त्यात आलियाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या इंटेमेसीबद्दल सुद्धा प्रश्न विचारले. त्यावर अनुराग म्हणाला कि जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळी आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घेतो. कदाचित मी या मुद्द्यावर जास्त काही बोलु शकत नाही पण मला या गोष्टीची चिंता नक्कीच वाटेल. मी केवळ इतकच म्हणीन की सुरक्षित रहा, फोन नेहमी ऑन ठेव आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा मला नक्की कॉल कर.

पुढे आलियाने अनुरागला विचारले की जर मी तुम्हाला लग्नाआधीच प्रेग्नेंट आहे असे सांगितले तर त्यावर तुमचे उत्तर काय असेल. त्य़ावर अनुरागने उत्तर दिले कि, मी सर्वात आधी तुला विचारेन कि तुला ते हवे आहे का.. तुला जे हवे असेल तेच मी करीन आणि अर्थात हे तुला चांगलेच माहित आहे. त्यामुळे तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. कदाचित मी तुला याची किंमत तुला चुकवावी लागेल असे सुद्धा म्हणने पण तरीही शेवट पर्यंत मी तुझ्या सोबत असेल.

लग्नापुर्वी शारिरीक संबंध ठेवण्याच्या आलियाच्या प्रश्नाला अनुरागने उत्तर दिले कि हा एक असा प्रश्न आहे जो ४० वर्षांपुर्वी महत्वाचा होता. त्यामुळे मला वाटते की आपण आता या प्रश्नाच्या खुप पुढे आलो आहोत. आपल्याला आपल्या सेक्शुएलिटी आणि ह्यूमन बॉडी नीट समजण्याची गरज आहे. आपण तसे काही करत असु तेव्हा कोणाच्या ही दबावा खाली नसले पाहिजे.

अनुराग म्हणतो की कुल दिसण्यासाठी करण्यात येणाऱ्या गोष्टी चांगल्या नसतात. एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी एखादी गोष्ट करणे चुकीचे आहे. त्यात जर ती गोष्ट आपल्या मनाविरोधात असेल तर ती करुच नये. अशीच गोष्ट करा जी तुम्हाला करायची असेल आणि ज्यासाठी तुम्ही स्वता तयार असाल. आलिया कश्यप चित्रपटांपासुन जरी दूर असली तरी तिच्या स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांची संख्या एक लाख एैंशी हजाराहुन जास्त आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *