सोशल मीडिया म्हटलं की, रोज काही ना काही नवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर पोस्ट होणाऱ्या लाखो व्हिडीओजपैकी सर्वाधिक नेटकरी जो व्हिडीओ पाहतात आणि त्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करतात तो व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतो. सोशल मीडियामुले एका रात्रीत जबरदस्त प्रसिद्धी मिळवणारे अनेकजण आहेत.

या व्हिडीओमुळे नेक ट्रेंड देखील तयार होतात, सोबतच अनेक मिम्स देखील यावर बनवले जातात. एखादा इमोशनल व्हिडीओ जर असेल तर लगेच मदत देखील त्या व्यक्तीस मिळते. सोशल मीडिया हे सध्याच्या काळात खरोखरीच एक मोठे व्यासपीठ झाले आहे. तर याच सोशल मीडियावर एका पाकिस्तानी मुलीचा वीडियो व्हायरल होत आहे. तिच्या सौंदर्यावर सर्वच नेटकरी घायाळ झाले आहेत.

filmygyan ने इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेयर केला आहे आणि This girl is going viral for all the right reasons ♥️ Kitni khoobsurat hai na yeh? असं कॅप्शन दिले आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी भाजी कापताना दिसत आहे. बिना मेकअप आणि स्टाईल याशिवाय देखील ती तितकीच सुंदर दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)


बॉलिवूडमधील एखादी अभिनेत्रीसारखी ती भासत असल्याचे काहींनी म्हटले आहे. नेटकरी तर तिच्या सौंदर्याचं कौतुक करून थकत नाही आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला बॉलिवूडमधलं प्रसिद्ध गाणं “तेरे ही सपने अंधेरों में उजालों में…कोई नशा है तेरी आंखों के प्यालों में…” हे सुरु आहे. तिच्या या व्हिडिओला ११ लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by jasmeen saini (@jasmeen_sainii)


या व्हिडिओच्या नंतर तिचे पूर्वीचे काही व्हिडीओज देखील समोर येत आहेत. गुगल मधून माहिती शोधली असता या मुलीचे नाव जस्मिन सैनी असे दिसत आहे. त्या व्हिडीओजवर केलेल्या कमेंट्समध्ये ती पाकिस्तानी असल्याचे म्हटले आहे. काही कमेंट्स वरून ती पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे असे समजते. तिच्या पूर्वीच्या व्हिडीओजला देखील लाखोंमध्ये लाईक्स आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *