चित्रपट हे मुख्यत्त्वे मनोरंजनाचं माध्यम आहे. चित्रपटाचे कथानक, गाणी, त्यातील कलाकार, चित्रित होणारी ठिकाणं, चित्रपट पूर्णत्त्वास नेणारी मोठी टीम हे सगळं मिळून एक चित्रपट तयार होतो. जो पूर्णपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज असतो. परंतु मनोरंजनापलीकडे या चित्रपटांतून सामान्य व्यक्तीला ही शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. चित्रपटांमधील एखादं पात्र त्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आणि त्या गोष्टींप्रती त्या पात्राचा असणारा दृष्टिकोन या सर्व गोष्टी चित्रपटातून प्रेक्षक पाहत असतात. वास्तविक जीवनातील प्रेरणादायक कथांवरील चित्रपट अधिक प्रेरणादायी ठरतात. मनोरंजनातून शिक्षण ही सांगड चित्रपटांनी कायमच जोपासली आहे. तर अशाच काही प्रेरणादायी चित्रपटांबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत.
१. The Walk – The Walk हा २०१५ साली प्रदर्शित झालेला अमेरिकन 3डी चरित्रात्मक चित्रपट आहे. हा चित्रपट फिलिप पेटिट या केबल वायरवर चालणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. फिलिप पेटिट हे फ्रान्समध्ये राहत असून लहानपणापासूनच त्यांना केबल वायरवर चालण्याचा शॉक होता. फिलिप पेटिट हे एक स्ट्रीट परफॉर्मर होते आणि ते वायर वॉकिंग करत असतं. एकदा त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्वीन टॉवरचा फोटो मॅगझीनमध्ये पाहिला आणि त्यांनी निश्चय केला कि या एका टॉवरपासून दुसऱ्या तोवरपर्यंत आपण वायर वॉक करायचं. ७ ऑगस्ट १९७४ साली फिलिप पेटिट यांनी या ट्वीन तोवरवर हाय वायर वॉक केला. त्यासंबंधित हा चित्रपट आहे. १९७४ च्या काळात जगातील काही उंच इमारतींपैकी एक ट्वीन टॉवर होती. अमेरिकेत २००१ मध्ये ओसामा बिन लादेनने ज्या बिल्डिंगवर हल्ला केला होता तीच ही बिल्डिंग होय.
गगनाला भिडलेल्या या इमातरींवर वायर वॉक करणे, हा साधा विचार देखील आपण करू शकत नाही. अशक्य गोष्ट शक्य करणं, हे यातून शिकायला मिळतं. १९७४ च्या काळात त्या बिल्डींग्स मध्ये प्रवेश करण्याची ही कोणाला अनुमती नसताना त्यांनी या बिल्डिंगच्या वरून हाय वायर वॉक केला. अशा संघर्षाच्या काळात आपले कोण अन परके कोण याचा बोध आपल्याला होतो आणि संघर्ष करून आपण यशस्वी कसे होतो.
२. Peaceful Warrior – २००६ साली चित्रित झालेला हा चित्रपट डॅन मिलमन यांच्या जीवनावर आधारित आहे. डॅन मिलमन हे एक जिमनॅस्ट होते. या चित्रपटामधील जे मुख्य भुईक साकारणारा जो मुलगा आहे तो स्वतःला खूप परिपूर्ण मानत असतो. त्याच्याइतका परिपूर्ण जगात कोणीच नाही असं त्याला वाटत असे, पण त्याचा हा भ्रम तुटो, ज्यावेळेस तो एका वृद्ध व्यक्तीला भेटतो. ती वृद्ध व्यक्ती त्या मुलापेक्षा देखील अधिक परिपूर्ण असते आणि ती वृद्ध व्यक्ती अशा काही गोष्टी करू शकत असते, ज्या या मुलाच्या विचारापलीकडील असतात. पुढे त्या मुलाची एक महत्त्वाची स्पर्धा असतानाच त्याचा अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये या मुलाचे हात-पाय तुटून जातात व तो कोणतीही गोष्ट करू शकत नसतो. या घटनेमुळे त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलून जातं.
या चित्रपटाच्या प्रत्येक सिनमधून काही ना काही प्रेरणा मिळते. आपल्या जीवनात आपण काही ध्येय निश्चित केलेली असतात आणि प्रत्येक जण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फार घाई करत असतो पण सोबतच या ध्येयप्राप्तीच्या प्रवासाचा आनंद लुटण्याचा मात्र विसर त्या व्यक्तीला पडतो. पण या चित्रपटात आपण आपले ध्येयप्राप्त करता असताना आपल्या जीवनाचा देखील कसा आनंद लुटू शकतो, हे यातून आपल्याला नक्कीच शिकता येईल.
३. Invictus – २००९ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट नेल्सन मंडेला यांच्या जीवनावर आधारित आहे. आज ही वर्णभेद हा तितकाच सर्रास केला जातो. हे वर्णभेदाचं प्रस्थ पूर्ण जगासाठीच आजच्या युगात देखील एक मोठी समस्या आहे. वयाची २७ वर्षे तु*रुं*ग*वा*स भोगून ७४ व्य वर्षी तु*रुं*गा*तून बाहेर येऊन दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृ*ष्ण*व*र्णी*य राष्ट्रपती बनले आणि दक्षिण आफ्रिकेचे भविष्यच बदलले. आपल्या आयुष्यात काही वेळेस अशा घटना सर्वच संपल्यासारखं वाटतं पण यातून पुन्हा उभारी घेऊन आपलं जीवन कस फुलवता येईल, हे या चित्रपटातून अधिक समर्पकतेने मांडले आहे.
४. Genius Albert Einstein – हा एक चित्रपट नसून ही एक सिरीज आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेली ही सिरीज नॅशनल जिओग्राफीवर उपलब्ध आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन हे जगप्रसिद्ध शाश्त्रद्न्य होते. अनेक विविध व महत्त्वाचे सिद्धांत त्यांनी मांडले. पण ही जगप्रसिद्ध व्यक्ती कशी घडली, त्यामागे कोणाकोणाचा पाठिंबा आहे, हे यातून पाहायला मिळेल. त्यांना एक प्रसिद्ध व उत्तम वैज्ञानिक बनवण्यामागे त्यांच्या पत्नीचा सर्वात मोठा वाट होता, पण पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या पत्नीला सोडून दिले.
जेव्हा ते पहिली प्रवेश परीक्षा देण्यासाठी गेले असता ते आणि पुन्हा एकदा परीक्षा देण्यासाठी त्यांना १ वर्ष थांबावे लागले, असे अनेक त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग या सिरीज मधून आपण पाहू शकता, असं म्हणतात की स्वतः चुका करण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुकांमधून नेहमी बोध घ्यावा. या चित्रपटातून आपल्याला कळतं की आपण आपल्या जीवनात कोणत्या चुका करत आहोत आणि त्या चुका आपण पुन्हा करणं, टाळलं पाहिजे.
५. The social Network – जगातील सर्वाधिक प्रसिद्ध व सर्वमान्य सोशल मीडिया ऍप्लिकेशन म्हणजे फे*स*बु*क. हा चित्रपट फे*स*बु*क*चा निर्माता मा*र्क झु*के*र*ब*र्ग याच्या जीवनावर व त्याने हे ऍप्लिकेशन कसे बनवले व अवघ्या २० व्या वर्षी सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती तो कसा बनला यावर आधारित आहे. २०१० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. २० वर्षाचा असताना मार्क झु*के*र*ब*र्गने एक असं ऍप्लिकेशन तयार केलं ज्याने येणाऱ्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला. हे ऍप्लिकेशन बनवताना कोणकोणत्या अडचणी आल्या, काय काय करावे लागले, ह्या सर्व गोष्टी या चित्रपटातून आपल्यलाला पाहायला मिळतील.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !