रितेश देशमुख आणि जेनेलिया हे जोडपं म्हणजे आयडियल कपल मानलं जातं. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि आदर्श जोडप्यांपैकी एक आहे. यांचं एकमेकांमधील बॉण्डिंग या दोघांना नेहमी जोडून ठेवतं. सोशल मीडियावर दोघे ही फार सक्रिय असतात. विनोदी व्हिडीओ, रिल्स, मजेशीर पोस्ट्स हे दोघे शेयर करत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्या या पोस्टमधून ते दोघे ही एकमेकांबद्दलचे प्रेम दर्शवत असतात. अनेक वर्ष चांगली मैत्री जोपासत मग त्यांनी लग्न केले.

रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही “तुझे मेरी कसम” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासूनच ह्या दोघांची ओळख. पण या दोघांमध्ये फार काळानंतर मैत्री झाली. कारण त्यावेळेस हे दोघे ही एकमेकांशी बिलकुल बोलत नसतं.

जेनेलियाला वाटले आपण बोलले आणि रितेश आपल्याशी नाही बोलला तर? त्यामुळे ते बोलली नाही आणि सोबतच रितेश देशमुखचे वडील त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यामुळे ती तिच्याशी बोलण्यास अधिक कचरत होती. त्यानंतर ते दोघे बोलायला लागले तेव्हा जेनेलियाने पहिला प्रश्न हाच विचारला की, तुझ्यासोबत तुझे सुरक्षारक्षक का नाहीत? आणि त्यांनतर या दोघांमध्ये मैत्री फुलत गेली आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला एकदा दिलेल्या मुलाखतीत रितेशने जेनेलिया व त्याच्या पहिल्या भेटीबद्दल सांगताना हे स्पष्ट केले होते. सध्या एका वेगळ्याच विषयावर चर्चेला उधाण आलंय ते म्हणजे, रितेशचं पहिलं प्रेम जेनेलिया नाही. रितेशने स्वतःच एका मुलाखतीत सांगितले कि, फोटोग्राफी हे त्याचं पहिलं प्रेम आहे. त्याला फोटोग्राफीची फार आवड आहे.

अभिनय क्षेत्रात आल्यानंतर त्याला त्याचा हा छंद जोपासता आला नाही. त्याचा पहिल्या प्रेमाचा जणू त्याला विसरच पडला होता. परंतु जेनेलियानेच रितेशला त्याचे पाहिजे प्रेम पुन्हा मिळवून दिले. जेनेलियाने त्याला फोटोग्राफी करण्याचा सल्ला तर दिलाच सोबत एक कॅमेरा देखील गिफ्ट केला. अशारितीने जेनेलियाने रितेशला फोटोग्राफीसाठी प्रवृत्त करत त्याला त्याचे पहिले प्रेम मिळवून दिले. हे “Made for each other” जोडपं स्वतःसोबत स्वतःच्या परिवाराशी देखील तितकेच घट्ट बांधलेले आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *