नातं म्हटलं कि प्रेम, विश्वास. आपुलकी, काळजी या सगळ्या गोष्टी आल्याचं. नाती ही आपल्या जागी सुंदर व योग्य असतात. पण काही नाती ही शेवट्पर्यंत टिकत नाही, मतभेद होतं त्या नात्याचा त्रास होण्यापेक्षा त्या नात्यातून मोकळं झालेलं चांगलं. काही अशी नशीबवान लोक असतात ज्यांना दुसऱ्यांदा आपल्या आयुष्यात प्रेमाने भरलेलं नातं पुन्हा एकदा मिळतं. पुन्हा एकदा ते प्रेमत पडून आपले जीवन सुंदर बनवतात. तर असेच काही मराठी कलाकार आहेत ज्यांचं पहिलं नातं यश्वी नाही ठरलं, परंतु त्यांना त्यांच्या जीवनातील खरे प्रेम हे दुसऱ्यांदा मिळाले.

१. विजय अंदाळकर – लग्नाची वाईफ वेडींगची बायको मालिकेतील मुख्य नायक म्हणजे विजय अंदाळकर. विजयने याच मालिकेतील त्याची सहनायिका रुपाली झनकर हिच्यासोबत साखरपुडा केला आहे. त्याने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. यापूर्वी त्याचे अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्यासोबत लग्न झाले होते, लग्नानंतर काही कारणास्तव ते दोघे वेगळे झाले.

२. सिद्धार्थ चांदेकर – मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय असलेला सिद्धार्थ चांदेकर हा मराठी चित्रपटांमध्ये तसेच सध्या मालिकेत देखील झळकताना दिसत आहे. सिद्धार्थचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे, त्यातील एक म्हणजे मुग्धा परांजपे. या दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केले परंतु काही खाजगी कारणास्तव ते दोघे ही वेगळे झाले. त्यानंतर सिद्धार्थला मिताली मयेकरच्या रूपात त्याला दुसऱ्यांद त्याचे खरे प्रेम मिळाले. लग्न करण्यापूर्वी या दोघांनी एकमेकांना २ वर्ष डेट केले. याच वर्षात हे दोघे लग्नबंधनात अडकले.

३. मिताली मयेकर – मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून आपल्या परिचयाची असलेली मिताली मयेकर हिला देखील दुसऱ्या वेळेस तिचे खरे प्रेम मिळाले. यापूर्वी तिने जिगरबाज मधील अभिनेता आणि मित्र श्रेयस राजे याला काही महिने डेट केलेलं. परंत्तू काही काळाने हे दोघे ही वेगळे झाले. त्या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले. त्यांनतर मिताली आणि सिद्धार्थने एकमेकांना २ वर्ष डेट करत हल्लीच पुण्यामध्ये त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.

४. शशांक केतकर – झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका “होणार सून मी या घरची” या मालिकेती नायक शशांक केतकर व नायिका तेजश्री प्रधान यांच्या नात्याबद्दल फार विवाद झाले होते. ते दोघे हि या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांनी लग्न देखील पण हे नातं वर्षभर देखील टिकलं नाही आणि दोघे ही या नात्यातून वेगळे झाले. यानंतर अभिनेता शंशनक केतकर याने त्याची मैत्रीण प्रियांका ढवळे हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला. तेजश्रीने अद्याप लग्न केलेलं नसून ती सिंगल आहे.

५. संग्राम समेळ – अभिनेता संग्राम समेळ याला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिले आहे. त्याने त्याच्या “रुंजी” या मालिकेत सहकलाकार असलेल्या अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत २०१६ साली विवाह केला. हे दोघे ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि बराच काळ मित्र राहिल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेत लग्न केले. लग्नाच्या काही वर्षानंतर, काही प्रॉब्लेम्समुळे या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांनतर संग्राम त्याच्या नृत्यांगना श्रद्धा पाठक नावाच्या एका मैत्रिणीला भेटला आणि तो तिच्या प्रेमात पडला. त्या दोघांनी देखील हल्लीच लग्न केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *