सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडीओ हे मोठ्या काळानंतर देखील लोकांच्या लक्षात राहतात. २०१८ मध्ये एका लग्नाच्या दरम्यान मध्य प्रदेशमधील विदिशा येथील रहिवासी असलेले प्रोफेसर संजीव श्रीवास्तव उर्फ ​​डब्बू अंकल गोविंदाच्या गाण्यावर ‘मैं से मीना से ना साथी से’ या गाण्यावरील त्यांचा डान्स फार व्हायरल झाला होता. एका रात्रीत ते फारच सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहे. या व्हिडीओने त्यांना नवीन ओळख निर्माण करून दिली. याच डब्बू काकांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो इंटरनेटवर सध्या फिरत आहे.

गोविंदाच्या ‘मैं से मीना से ना साथी से’ या गाण्यावर डब्बू अंकल पुन्हा एकदा थिरकले. वास्तविक हा एका कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे, जिथे डब्बू अंकल पहिल्यांदा ‘मैं से मीना से ना साथ से’ च्या पूर्ण गाण्यावर नाचताना दिसले. खास गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये पुन्हा त्याची पत्नीही त्यांना साथ देताना दिसत आहे. आकृती डिजिटल स्टुडिओने गेल्या महिन्यात यूट्यूबवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत ३८ लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावरील लोक या डान्सला आजवरचा सर्वोत्कृष्ट परफॉरमन्स बनवत आहेत.

डान्स हा डब्बू अंकलच्या रक्तात भिनला आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्याच्यावर स्वार झालेल्या नृत्याचं वेड अद्याप तसाच आहे. हे वेड इतके प्रचंड होते कि,महाविद्यालयातील मुलेसुद्धा संजीवच्या नृत्याने दरवर्षीच्या कार्यक्रमाची सांगता करतात. प्रोफेसर साहेबांचे मिथुन चक्रवर्तीपासून ते गोविंदा आणि जावेद जाफरीपर्यंतचे डान्सर हे त्यांचे आवडते डान्सर आहेत. यापूर्वी ते नृत्य स्पर्धांमध्येही भाग घ्यायचे पण आता ते केवळ छंदासाठीच नृत्य करतात. डब्बू अंकलप्रमाणे सर्वांनीच आपला चांद जोपासत स्वतःला देखील आनंदी ठेवले पाहिजे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *