बॉलिवुड म्हटलं की रोज नवं गॉसिप रोज नव्या चर्चा या येतात. बॉलिवुड कलाकारांसोबत त्यांची मुलं देखील स्टारकिड म्हणुण प्रसिद्ध होत असतात. लोकांना सुद्धा या मुलांच राहणीमान कसं आहे. त्यांच आयुष्य सर्वसामान्य मुलांसारख आहे की टीव्हीवर दिसणाऱ्या मुलांसारख यांसाऱख्या गोष्टींची उत्सुकता असते. स्टारकिड्स मध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं मुलं म्हणजे अभिनेत्री करीना कपुर आणि सैफ अली खानचा मोठा मुलगा तैमुर.. तो लहानपणापासुनच लाइमलाइटमध्ये होता.

त्यानंतर करीनाने २१ फेब्रुवारीला तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्याच्या जन्मानंतर सुद्धा प्रेक्षकांना तैमुरचा छोटा भाऊ कसा असेल. तो कोणासारखा दिसत असेल.. त्याच नाव काय असेल या सर्व गोष्टींची उत्सुकता लागली होती. लोक त्याच्या नावाबद्दल वेगवेगळे अंदाज लावत होते. खुप दिवस झाले तरी त्या बाळा बद्दल करीना कडुन कोणतीच खबर बाहेर आली नव्हती. तैमुरच्या जन्मानंतर त्य़ाच्या नावावरुन खुप वाद झाला होता त्यामुळे कदाचित पुन्हा तिच चुक होऊ नये यासाठी करीना आणि सैफने त्यांच्या दुसऱ्या नावाबद्दल ती चुक केली नसावी.

खुप काळाच्या प्रतिक्षेनंतर करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव जग जाहिर केले आहे. तिच्या दुसऱ्या बाळाचे नाव जेह असे ठेवले आहे. रणधीर कपुरने हे नाव जाहिर केल्याचे समजले जात आहे. या नावाचा अर्थ सुद्धा खुप सकारात्मक आहे.
ज्य़ोतिष शास्त्रानुसार जेह हे एक पारसी नाव आहे. या नावाचा अर्थ ‘येणे’ असा होतो. हे खुप सकारात्मक असे नाव आहे. या नावाच्या अर्थाप्रमाणे त्या मुलाच्या येण्याने परिवारात खुप सुख येणार असा होतो. जेह हे नाव सकारात्मकता आणि शुभतेचे प्रतिक आहे. परंतु तरीही सोशल मीडियावर ते ट्रोल झालेच !

अंक ज्योतिषानुसार जेह या नावाला ७ आकडा येतो. साधारणपणे ज्या नावांची अंक ज्योतिष संख्या ही चार, सात आणि आठ येतो त्या मुलांना रिकमेंड केले जात नाही कारण ही मुल खुप आध्यात्मिक असतात. ते सांसारिक भावनांपासुन दूर राहणे पसंत करतात. कदाचित ती मुले वैवाहिक आयुष्यापासुन सुद्धा दूर राहु शकतात. त्यांना व्यवसायात रस नसतो. त्यामुळे ही मुले दुनियादारी पासुन सुद्धा दुर राहतात. ज्योतिषशास्त्रानुसार ही मुले संत महत्मासुद्धा बनु शकतात. या लोकांना दान-पुण्य करण्यात जास्त विश्वास असतो.

जेह या नावावरुन असे समजते कि त्या बाळाचे त्याच्या आईशी खुप जवळचे संबंध असणार आहेत. या व्यतिरिक्त ते बाळ खुप भावुक आणि दयावान असणार आहे. त्याला त्याच्या भाग्यावरुन खुप काही मिळणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *